साताऱ्याचा गड आला पण राष्ट्रवादीचा सिंह गेला

महेश शिंदे : 100894 शशिकांत शिंदे : 94595
साताऱ्याचा गड आला पण राष्ट्रवादीचा सिंह गेला

सातारा : अटीतटीच्या झालेल्या कोरेगाव मतदारसंघातील निवडणुकीत भाजपमधून शिवसेनेत आलेले महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांचा सहा हजार मतांनी पराभव केला. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होत असताना राष्ट्रवादी चा पक्ष प्रतोद पराभूत झाला. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरेगाव मतदारसंघात भाजपचे महेश शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपासून आमदार शिंदे यांचा गड पोखरण्यास सुरवात केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामे देऊन ताकद दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कडून महेश शिंदे यांना पोस्टर बॉय अशी खिल्ली उडवली होती. तरीही महेश शिंदे यांनी आमदार शिंदे यांचा किल्ला पोखरण्याचे काम सुरू ठेवले होते. आमदार शिंदे यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष झाले. तरीही निवडणुक लागू झाली आणि आमदार शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली. मतदार संघ शिवसेनेकडे असल्याने महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक रिंगणात उतरले. यावेळेस उदयनराजे भोसले यांची साथ महेश शिंदे यांना मिळाली. त्यांनी महेश शिंदे यांच्या प्रचारात सहभागी होऊन कोरेगाव मतदारसंघात सहभागी असलेले सातारा तालुक्यातील दोन गट विरोधात घालविले. तसेच महेश शिंदे यांचे मूळ गाव खटाव तालुक्यातील असल्याने तीन स्थानिक उमेदवार म्हणून खटाव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातील लोकांनी साथ दिली. तसेच कोरेगाव मधूनही महेश शिंदे चांगले चालले. मतमोजणीत पाहिल्या फेरीपासून अल्प मताधिक्य घेतले होते. 1600, 2000 त्यानंतर 25 व्या फेरीला महेश शिंदे यांनी 1617 मतांची अगदी घेतली. त्यानंतर झालेल्या पाच फेरीतील मतमोजणीत महेश शिंदेंनी आघाडी कायम ठेवत 31 व्या फेरीत 6000 पेक्षा अधिक मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com