शाहरूख खानची मस्ती जयंत पाटलांनी उतरवली 

शाहरूख खानची मस्ती जयंत पाटलांनी उतरवली 

अलिबाग : उर्मट आणि नेहमीच मस्तीत वावरणारा बॉलिवूडचा किंगखान शाहरुखला शेकापचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी खडे बोल सुनावतानाच त्याचे पाय जमीन आणले. शाहरूखचा अलिबाग दौरा वादाचा मुद्दा ठरला आहे. शाहरुखच्या बोटीमुळे आमदार पाटील यांना ताटकळत थांबावे लागल्याने त्यांचा पारा अधिकच चढला. ""तू अलिबाग विकत घेतला नाहीस, माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला येऊ शकत नाही,'' असे सुनावत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 

शाहरुखमुळे जनतेला त्रास झाला असून हा मुद्दा मी अधिवेशनात मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शाहरुखने गेल्या तीन नोव्हेंबर रोजी अलिबागमधील फार्म हाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला. तो बोटीने अलिबागवरुन परतत होता. त्याची बोट गेट वे ऑफ इंडियाजवळील जेट्टीवर पोहोचली. मात्र बराच वेळ तो बोटीत बसून होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

शाहरुखमुळे जेट्टीवर प्रवाशांनाही पोलिसांनी थांबवले होते. याचा फटका जयंत पाटील यांनाही बसला. जयंत पाटील हे देखील बोटीने अलिबागला जाण्यासाठी निघाले होते. हा सर्व प्रकार बघून पाटील संतापले. त्यांनी शाहरुखला गर्दीसमोरच खडे बोल सुनावले. गर्दीतील काही तरुणांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


जयंत पाटील यांनी सांगितले, की सुट्टीचे दिवस असल्याने अलिबागला बोटीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. शाहरुखमुळे जेट्टीवरील वाहतूक थांबवावी लागली. यामुळे असंख्य प्रवाशी खोळंबले होते. शाहरुख बोटीत बसून सिगारेट ओढत होता, चाहत्यांना फ्लाईंग किस देत होता, पण प्रवासी खोळंबले होते. यामुळेच मी त्याला सुनावले. पोलीस शाहरुखची बाजू घेत होते, हल्ली मंत्र्यांनाही एवढी सुविधा दिली जात नाही, मग शाहरुखसाठी एवढा खटाटोप का ? मी हा मुद्दा अधिवेशनातही मांडणार आहे. 

शाहरूख ज्या मस्तीत वावरत असल्याने आमदार पाटील यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com