शर्मिला येवलेने मांडली शरद पवारांपुढे कैफियत - Sharmila Yeole Meets Sharad Pawar at Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

शर्मिला येवलेने मांडली शरद पवारांपुढे कैफियत

मुरलीधर कराळे
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

येवले ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेकल्यानंतर चर्चेत आली. अकोले येथील प्रश्न मांडून तिने भाजपमध्ये नुकतेच गेलेले आमदार वैभव पिचड यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरही तिला अद्याप कोणतीही नोटीस दिलेली नाही. याबाबत तिने सद्यस्थिती पवार यांना सांगितली.

नगर : ''मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु पोलिसांनी अद्याप नोटीस दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोले येथे होणाऱ्या सभेस मी उपस्थित राहणार आहे, तेथे मात्र पोलिसांकडून मला अटकाव होण्याची शक्यता आहे,'' अशी कैफियत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या शर्मिला येवले हिने राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली.

येवले ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेकल्यानंतर चर्चेत आली. अकोले येथील प्रश्न मांडून तिने भाजपमध्ये नुकतेच गेलेले आमदार वैभव पिचड यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरही तिला अद्याप कोणतीही नोटीस दिलेली नाही. याबाबत तिने सद्यस्थिती पवार यांना सांगितली.

पिचड विरोधकांना सहकार्य करु
अकोले तालुक्यातील प्रश्न अनेक आहेत. मात्र तेथील आमदारांनी प्रश्न सोडविण्याएेवजी स्वतः लाखमोलाच्या गाड्या घेऊन फिरतात. पिचड यांच्या विरोधात कोणताही उमेदवार असेल, तर आम्ही त्यांना साह्य करू. अकोले येथे एकास एक उमेदवार देण्यात येणार असून, त्यास आम्ही सहकार्य करणार आहोत. राष्ट्रवादीच्या सभेस जाण्यास मला पोलिसांकडून अटकाव होऊ शकतो, याबाबत मी शरद पवार यांना माहिती दिली असल्याचे शर्मिला येवले हिने 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख