शरद राव यांच्या पुतळ्याचे उद्या पवारांच्या हस्ते अनावरण

शरद राव यांच्या पुतळ्याचे उद्या पवारांच्या हस्ते अनावरण

पिंपरीः दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या तळेगाव दाभाडे येथील पंचधातूच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.1) होणार आहे. 

राव यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ, कडोलकर कॉलनी येथे हा सोहळा होणार आहे. त्याचे स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, तर अध्यक्ष हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. महाबळ शेट्टी असतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी आज येथे दिली. राव यांचे हे चिरंतन स्मारक म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते ऍड. सुखदेव काशीद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. 

झिंजुर्डे म्हणाले,""राव यांनी चौदा राज्यांमधल्या अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले. कामगारांसाठी लढणारा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणून त्यांची लोकप्रियता होती.``

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने - उद्योग - व्यवसायातील कामगार-कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्‍सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीत, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी- कष्टकरी, गोर-गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र ते झटले. प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका-परिसेविका-तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि अभियंत्यांचा देदिप्यमान ऐतिहासिक संघर्ष त्यांनी केला, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com