जेव्हा महात्मा फुलेंचा संदर्भ देवून शरद पवार प्रहार करतात!

महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे. शरद पवार महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांचे स्मरण करतात. आज पवार यांनी हे ट्विट केल्याचे कारण राजकीय विश्लेषक डॉ प्रकाश पवार यांनी सांगितले
sharad pawars twit attacks on superstitions
sharad pawars twit attacks on superstitions

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज सकाळी केलेल्या एका ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार यांनी महात्मा फुलेंचा संदर्भ घेवून अंधश्रद्धाळू वृत्तीवर प्रहार करणारे ट्विट केले आहे. 

पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये महात्मा फुले यांचे स्मरण करत, "महात्मा फुले यांनी कधीच अंधश्रद्धेचे समर्थन केले नाही. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते. यातून चिकित्सेचा मार्ग थांबतो. काहीही झाले तरी माणसाने दैववादी होऊ नये. माणसाने सदैव चिकित्सक असले पाहिजे, ज्ञानाचे समर्थन करण्याची भूमिका स्वीकारावी. या रस्त्याने जाण्याचा आपण निर्धार करू." असे म्हटले आहे.

महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे. शरद पवार महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांचे स्मरण करतात. आज पवार यांनी हे ट्विट केल्याचे कारण राजकीय विश्लेषक डॉ प्रकाश पवार यांनी सांगितले. "शरद पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा ज्या महाराष्ट्रावर प्रभाव आहे, त्या महाराष्ट्रातील लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टी न करता विज्ञानवादी मार्गाने जावे आणि त्याच मार्गाने आपले प्रश्न सोडवावेत, असे त्यांना सांगायचे आहे." 

"नरेंद्र मोदी यांच्याकडे शरद पवार हे राजकीय दृष्टीने पहात नाहीत तर ते या देशाचे पंतप्रधान म्हणून बघतात. पंतप्रधान मोदींनी देशाला असा दिवे लावण्याचा मार्ग न दाखवता विज्ञानाचा मार्ग दाखवावा आणि संकटातून बाहेर काढावे असे पवार यांना वाटते. तसेच लोकांनी दैववादी न बनता महात्मा फुले यांनी जो परिवर्तनाचा मार्ग दाखवला त्याच मार्गाने जावे, असे पवार यांना सांगायचे आहे,"असे विश्लेषण डॉ. प्रकाश पवार यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com