इंद्रायणी -चंद्रभागा प्रदुषणमुक्त करण्यासाठी पवार साहेबांनी केली कामाला सुरुवात

जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यानिमित्त आळंदीत हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. यावेळी श्री. पवार शनिवारी(ता.11) प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.वारक-यांनी श्री,पवार यांना इंद्रायणी चंद्रभागेच्या शुद्धीकरणाबाबत साकडे घातले होते
Sharad Pawar Working on Making Indrayani Chandrabhaga Rivers Pollution Free
Sharad Pawar Working on Making Indrayani Chandrabhaga Rivers Pollution Free

आळंदी : भीमा,भामा, इंद्रायणी या चंद्रभागेच्या उपनद्या असून त्यांच्या शुद्दीकरण आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनामार्फत नमामि चंद्रभागा अभियान अंतर्गत पुण्यातील साखर संकूल येथे आढावा बैठक झाली. दरम्यान समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करणे पवार घराण्यातील जन्मलेल्यांचीच जबाबदारी राहील असे आळंदीत शनिवारी (ता.8) आळंदीत वक्तव्य करून इंद्रायणी आणि चंद्रभागा प्रदुषणमुक्त करण्याचा वारक-यांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना मोठ्या धडाक्यात या बैठकीपासून कामाला सुरूवात केली.

एवढ्यावरच श्री.पवार थांबले नाहीत तर 17 फेब्रुवारिला राज्याचे मुख्य आयुक्तांसोबत पु्न्हा याबाबत बैठकही घेण्याचे पक्के केले असून अवघ्या दीड ते पावणे दोन वर्षात काम पू्र्ण करायचे आहे अशी सुचनाही बैठकित अधिका-यांना दिल्या.

पुण्यातील साखर संकूल कार्यालयात झालेल्या बैठकिस जलसंपदा मंत्री जयंती पाटील,कामगार मंत्री दिलिप वळसे पाटील,खेडचे आमदार दिलिप मोहिते, विभागिय आयुक्त दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,पुणे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यानिमित्त आळंदीत हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. यावेळी श्री. पवार शनिवारी(ता.11) प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.वारक-यांनी श्री,पवार यांना इंद्रायणी चंद्रभागेच्या शुद्धीकरणाबाबत साकडे घातले होते. 

यावर उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, "काळजी करू नका आश्वासन हे आश्वासन नाही तर ते माझे कर्तव्य आहे. इंद्रायणी शुद्दीकरण आणि स्वच्छ करणे ही वारकरी संप्रदायासह समाजाची मागणी असून ती मला भावली. समाजाच्या अपेक्षांची पू्र्तता करणे पवार घरण्यातील जन्मलेल्यांचीच जबाबदारी राहील. लवकरच मुंबईला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांसोबत इंद्रायणी स्वच्छतेबाबत बैठक लावून पाठपुरावा केला जाईल.''

....आणि दिलेला शब्द खरा करत श्री.पवार त्यांच्या नेहमीच्या अंगभूत शैलीत कामाला लागले आणि तशी बैठकही मंगळवारी(ता.11)आयोजित केली. यावेळी श्री. पवार यांनी शासकिय अधिका-यांकडून सादर केलेला नद्यांच्या संवर्धनासाठीचा सादरीकरणाचा आढावा घेतला. त्यामधे वेळोवेळी सुचनाही केल्या. भीमा,भामा सह इंद्रायणी पंढरपूरला जावून मिळतात. आळंदी देहू पंढरपूर ही तिर्थक्षेत्र वारक-यांचे श्रद्धास्थान असून वारकरी तिर्थस्नान करताना पाणी पितात.मात्र सध्याची इंद्रायणी आणि चंद्रभागाची अवस्था पाहिली तर वारक-यांना प्रदुषित पाणी प्यावे लागते हे पाहावत नाही.यामुळे येत्या दीड पावणे दोन वर्षांच्या कालावधित नद्या कोणत्याही परिस्थीतीत स्वच्छ राहल्या पाहिजे हा मानस श्री. पवार यांनी बैठकीत बोलून दाखविला.

याचबरोबर पिंपरी महापालिका हद्दीतून इंद्रायणीत होणारे प्रदुषणाबरोबरच,चाकण,कुरकुंभ आणि रांजणगाव सारख्या औद्योगिक भागातील प्रदुषण रोखणे आवश्यक आहे.तसेच निरा नदीची अवस्था भयानक आहे.जलपर्णी काढणे,छोट्या बंधा-यांसोबत कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधण्याबरोबरच पुण्यातील मुळा मुठा नदीचे प्रदुषण भयानक असून कोरेगाव पार्क याठिकाणी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी चिंताजनक असून यावर विचार होणे आवश्यक असल्याचे श्री. पवार यांनी बैठकीत सांगितले.

नदीप्रदुषणाबरोबरच मोठ्या शहरांबरोबरच औद्योगिक भागातील ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापन आवश्यक आहे.तर लोणावळा शहरातून कोकण भागात उतरणा-या उल्हास नदीच्या प्रदुषणावरही चर्चा करण्यात आली. निधीसाठी राज्य सरकारने कंपन्यांकडून येणारा सिएसआरचा निधी नदी प्रदुषण रोखण्यासाठी आणि पायाभूत सुविधां निर्माण करण्यासाठी वापरण्याबाबत बैठकीत विचार झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com