Sharad Pawar Will Meet Narayan Rane Today Noon | Sarkarnama

शरद पवार - नारायण राणेंच्या भेटीचा 'अजेंडा' काय? दुपारी एक वाजता होणार भेट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 डिसेंबर 2018

शरद पवार गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज कणकवली ओम गणेश बंगल्यावर नारायण राणे यांची भेट घेणार आहेत. मात्र ही नेमकी भेट कोणत्या उद्देशाने घेतली जाणार आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र आज दुपारी एक वाजता ते राणे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सिंधूदूर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आज दुपारी होणाऱ्या भेटीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पवार आणि भाजपशी जवळीक असणारे राणे यांच्यात कुठली 'लंच डिप्लोमसी' होणार याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या भेटीला राणेंचे पूत्र आमदार नितेश राणे यांनीही दुजोरा दिला आहे. 

पवार गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज कणकवली ओम गणेश बंगल्यावर नारायण राणे यांची भेट घेणार आहेत. मात्र ही नेमकी भेट कोणत्या उद्देशाने घेतली जाणार आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र आज दुपारी एक वाजता ते राणे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, पवार व राणे यांच्या आजच्या भेटीला राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, "आमचे विरोधक सांगतात की कोकणात राणेंची ताकद संपलेली आहे. पण राणेंची ताकद काय आहे, हे सर्वांना माहित आहे. राणेंशिवाय इथले पान हलत नाही. हे आमच्या विरोधकांनीही लक्षात ठेवावे. आज जिल्ह्यात कुणीही नेता मंत्री आला तरी तो राणेंची भेट घेतल्याशिवाय कोकण सोडू शकत नाही. आमच्या विरोधकांनी हे नीटपणे पहावं आणि अनुभवावं."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख