मंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्यांना शरद पवार यांनी फटकारले

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद येणार आहेत.
sharad_Pawar
sharad_Pawar

चिपळूण :  मंत्रिपदाच्या मागणीसाठी येणाऱ्या एकाही शिष्टमंडळाला भेटणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्यांना पवारांनी एका प्रकारे फटकारले आहे. 

मंत्रिपदाच्या मागणीसाठी येणारे शिष्टमंडळ घेऊन येणार असाल तर कोणीही येऊ नका. माझ्यासमोर महाराष्ट्रातील अन्य प्रश्‍न आहेत. कोण किती मताने निवडून आला आहे आणि कोणाला मंत्रिपद दिले पाहिजे याची मला पूर्ण माहिती आहे. जर कुणाला मंत्रिपद मिळाले नाही तर नाराज होऊ नका. योग्य वेळी प्रत्येकाचा विचार केला जाईल, असे पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.    

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर निकम हे एकमेव आमदार निवडून आले. 

रायगड जिल्ह्यातून खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे निवडून आल्या . तटकरेंचा मुलगा विधान परिषदेचा आमदार आहे. निकम आणि तटकरे दोघेही पवारांच्या जवळचे आहेत. या दोघांपैकी कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद येणार आहेत. त्यातील एक तरी मंत्रिपद रत्नागिरी किंवा रायगडला मिळावा यासाठी कार्यकर्त्यांकडून लॉबिंग सुरू आहे. काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे लेखी पत्राद्वारे मंत्रिपद देण्याबाबत शिफारस केली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरे लेटरहेडही फिरत होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधून भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्या कार्यकर्त्यांना पवारांनी स्पष्ट शब्दात भेट नाकारल्याचे वृत्त आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com