भाजपला विधानसभेत आणि अजितदादांना बारामतीत चितपट करणार : शरद पवारांचा निर्धार

शरद पवार लढण्याचा निर्धार! बारामतीत अजित पवारांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचे संकेत...
sharad pawar warns bjp
sharad pawar warns bjp

सातारा : नव्याने स्थापन झालेल्या भाजपच्या सरकारला सभागृहात स्पष्ट बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिघांचे मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतला जाईल. आमच्यात सर्वसंमती झाली आहे. आम्ही यापुढे एकत्र राहणार असून पुढे येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. हा निर्णय राष्ट्रवादी पक्षांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडीनंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यानंतर सर्वांनी पत्रकारांशी संवाद साधनू आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उध्दव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सरकार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनेचे 56 आणि राष्ट्रवादीचे 54 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार ही संख्या शिवसेनेसोबत पाठींबा देणारे आणि काही अपक्ष सभासद असे 169 च्या आसपास झाली आहे. आमची चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या आहेत. सकाळी पावणे सात ते साडे सात वाजता मला समजले. मला आश्‍चर्य वाटते माननीय राज्यपाल सर्व कार्यक्रम सोडून महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत इतक्‍या सकाळी सहभागी होतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे काही सदस्य त्या ठिकाणी गेले होते.. त्यानंतर थोड्यावेळात शपथविधीही झाला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. हा निर्णय राष्ट्रवादी पक्षांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार आहे.

``विधीमंडळाचा सभासद असो किंवा आमदार असो भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेत आमचे कोणी ही सहभागी होणार नाही. जे काही सदस्य त्यांच्यासोबत गेलेले आहेत. त्यांना याची पूर्ण माहिती असावी. आपल्या देशात पक्षांतरबंदीचा कायदा आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व जाण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पाठींबा नाही. शपथविधी झाल्यानंतर ते उपस्थित राहिलेल्या आमच्या काही सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. राजभवनातून सुटका झाल्यानंतर आमचे सदस्य माझ्याकडे घरी आले आहेत.

यानंतर डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, ``मी राजभवनात गेलो आणि अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला येथे शपथविधी असल्याचे समजले. राजभवनात जाईपर्यंत मला पुसटशीही कल्पना नव्हती. कोणालाही या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता. देवेंद्र फडणवीस तेथे आले त्यानंतर आम्हाला थोडाफार अंदाज आला. त्यानंतर राज्यपाल तेथे आले व शपथविधी झाला. ताबडतोबीने शपथविधी झाला. मी माझी मिका मांडत असून मी राष्ट्रवादीसोबत आणि पवारसाहेबांसोबत राहणार आहोत. मला आमच्या नेत्यांचा फोन आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो.`` यावेळी संदीप क्षीरसागर यांनीही अशीच भूमिका मांडली.


यानंतर शरद पवार म्हणाले, आम्ही तीन पक्ष नवीन सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र आलो. त्यावेळी राष्ट्रवादीचे 54 सदस्यांच्या सहया असलेले पत्र आम्ही दिले आहे. या 54 जणांचा पाठींबा महाशिवआघाडीसोबत आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या भाजपच्या सरकारला सभागृहात स्पष्ट बहुमत सिध्द करता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिघांचे मिळून सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. आमच्यात सर्व संमत्ती झाली आहे. आम्ही यापूढे एकत्र राहणार असून पुढे येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. लवकरच आम्ही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार असून आमचे सर्व सदस्य एकत्र असतील.

अजित पवारांच्या बंडखोरीबाबत पवार म्हणाले, याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही, सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतात. त्यानुसार निर्णय होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com