शरद पवार उद्या कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या भेटीला जाणार 

पूरग्रस्त सांगली तसेच कोल्हापूरमधील गावांच्या पूनर्वसनाचा प्रश्‍न मोठा आहे. पूनर्वसनासाठी गावठानांची गरज आहे. मात्र, ही सारी गावे बागायती क्षेत्रात असल्याने गावठाणांसाठी जागा मिळणे अवघड असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
शरद पवार उद्या कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या भेटीला जाणार 

पुणे : पूरग्रस्त सांगली तसेच कोल्हापूरमधील गावांच्या पूनर्वसनाचा प्रश्‍न मोठा आहे. पूनर्वसनासाठी गावठानांची गरज आहे. मात्र, ही सारी गावे बागायती क्षेत्रात असल्याने गावठाणांसाठी जागा मिळणे अवघड असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केले. अनौपचारिक चर्चेत बोलताना पवार यांनी सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांविषयी काळजीची भावना व्यक्त केली. उद्या आपण कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

सांगली-कोल्हापूर भागात पुरात बुडालेली मातीची घरे टिकणार नाहीत. पाण्यात राहिल्याने त्यांना भेगा पडतील, असे पवार यांनी सांगितले. या भागातील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेकडो लोकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून मोठ्याप्रमाणात मदत येत आहे. मात्र, ही मदत रस्त्यावरच्या गावापर्यंत मर्यादीत न राहता रस्त्याच्या आतल्या भागात असलेल्या छोट्या गावातील लोकांपर्यंत पोचण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलच्यावतीने आज सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रूग्णवाहिकांसह एक पथक आज पुण्यातून रवाना झाले. पवार यांच्या हस्ते या पथकाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. अनौपचारिक चर्चेत बोलताना पवार यांनी पूरग्रस्तांना नेमक्‍या मदतीची गरज असल्याचे सांगितले. तयार अन्न देण्यापेक्षा स्वयंपाक तयार करण्यासाठी आवश्‍यक शिधा दिला तर ते अधिक उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच्या दौऱ्यात सांगलीला भेट दिली. मात्र, रस्त्यावर पाणी असल्याने त्यांना कोल्हापूरचा दौरा रद्द करावा लागला होता. उद्या ते कोल्हापूरला जाणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com