शरद पवार, विजयदादा, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र 

शरद पवार, विजयदादा, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र 

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या (व्हीएसआय) वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने राजकारणातील एकमेकांचे विरोधक बनलेले राजकारणी बुधवारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 

गेल्यावर्षी झालेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मात्र, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार होते. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील वगळता त्यांच्या सर्व कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांनी अद्याप पक्षाचा राजनीनामा दिलेला नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून इंदापूरमधून निवडणूक लढवले हर्षवर्धन पाटील आजच्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या शेजारी बसले होते. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील, हर्षयर्धन पाटील व अजित पवार यांनी एकमेकांवर आरोप केले होते. इंदापूरची जागा आपल्यासाठी सोडली जात नाही हे लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी एका रात्रीत भाजपात प्रवेश करून इंदापूरमधून भाजपाची उमेदवारी मिळवली होती. या साऱ्या राजकीय पार्श्‍वभूमीनंतर सत्ताबदल झाला आणि या कार्यक्रमानिमित्त हे सारे एकाच व्यासपीठावर परत एकत्र आले. 

विजयसिंह मोहिते-पाटील व हर्षवर्धन पाटील यांचा "व्हीएसआय' या संस्थेशी जुना संबंध आहे. दोघेही संस्थेचे पदाधिकारी राहिले आहेत. राजकारणात काही बदल झाला असला तरी सहकारी साखर कारखानदारीच्या पातळीवर प्रत्येकाचे प्रश्‍न सारखेच आहेत. त्यामुळे या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी सहकारातील सारेच नेते नेहमीच एका व्यासीपीठावर येतात. 

शेतकऱ्यांचे सारेच प्रश्‍न मोठे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही काम करत राहू. शेकतरी कर्जमुकत झालाच पाहिजे यास आपल्या सरकारची प्राथमिकता असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com