विधानसभेला राष्ट्रवादीची नव्या चेहऱ्यांना संधी; विलास लांडे मुकणार,दत्ता सानेंना चान्स मिळणार?

मावळ लोकसभा मतदारसंघात लोकसभेला झालेल्या पराभवामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची पवारांनी ही बैठक घेतली.ती पक्षाचे पहिले आमदार (लांडे) राहिलेल्या व आता भाजपचे सहयोगी सदस्य (महेश लांडगे)असलेल्या भोसरीत घेण्यात आली. लांडे हे पवारांच्या डाव्या बाजूला,तर साने हे उजव्या बाजूला बसले होते. त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक हजर होते.
विधानसभेला राष्ट्रवादीची नव्या चेहऱ्यांना संधी; विलास लांडे मुकणार,दत्ता सानेंना चान्स मिळणार?

पिंपरी : जुन्या त्याच त्याच चेहऱ्यांऐवजी आगामी विधानसभेला नव्यांना संधी देण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत पक्षाच्या चिंतन बैठकीत केले. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला माघार घ्यावे लागलेले या मतदारसंघाचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे-पाटील हे विधानसभेला सुद्धा मुकण्याची शक्‍यता शक्‍यता वाढली आहे.दुसरीकडे, पालिकेतील पक्षाचे गटनेते व विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांचे चान्सेस, मात्र वाढले आहेत.

भोसरीच्या जोडीने शहरातील पिंपरी या राखीव मतदारसंघातून इच्छुक असलेले या मतदारसंघाचे पहिले आमदार अण्णा बनसोडे यांचाही हिरमोड होणार आहे. त्यामुळे तेथेही नगरसेविका सुलक्षणा धरसारख्या नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. हीच गत चिंचवड या तिसऱ्या मतदारसंघात होणार आहे. तेथेही यापूर्वी निवडणूक लढविलेल्यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. परिणामी तेथूनही शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक मयूर कलाटेंसारखा नवा तरुण व आक्रमक असा चेहरा दिला जाईल,अशी शक्‍यता आहे.

कारण तेथे भाजपचे भाऊबली आमदार लक्ष्मण जगताप यांचा सामना करावा लागणार आहे. तर, भोसरीतही महेशदादासारख्या तगड्या पैलवानासमोर त्यांचे सर्व गेमप्लान माहीत असलेले दत्ताकाका यांच्यासारखा आक्रमक पुरून उरेल असा नवा चेहरा राष्ट्रवादीला द्यावा लागणार आहे.लोकसभेनंतर लांडगे यांनी विधानसभेचीही तयारी लगेच सुरू केली असून त्यासाठी वॉररुमही उघडली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात लोकसभेला झालेल्या पराभवामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची पवारांनी ही बैठक घेतली.ती पक्षाचे पहिले आमदार (लांडे) राहिलेल्या व आता भाजपचे सहयोगी सदस्य (महेश लांडगे)असलेल्या भोसरीत घेण्यात आली. लांडे हे पवारांच्या डाव्या बाजूला,तर साने हे उजव्या बाजूला बसले होते. त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक हजर होते. मावळात पवारांचे नातू व अजित पवारांचा मुलगा पार्थ याचा पराभव झाला आहे.

यावेळी त्यांनी शहरात विधानसभेला जुन्या त्याच त्याच चेहऱ्यांऐवजी नव्यांना संधी द्या, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. ती करताना,मात्र उमेदवार एकमताने तुम्हीच निवडा,असे स्वातंत्र्यही त्यांनी शहर पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले.त्यांच्या या आदेशवजा अपेक्षेने माजी आमदार व जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणून गेले आहे.तर नवे व तरुण चेहरे आनंदले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com