शरद पवारांची साथ सोडणाऱ्या दिग्गजांना मतदारांनी धडा शिकविला !

शरद पवारांची साथ सोडणाऱ्या दिग्गजांना मतदारांनी धडा शिकविला !

पुणे : शरद पवारांच्या झंझावती दौऱ्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळ मिळाले असून विदर्भात कॉंग्रेसनेही चांगली कामगिरी केली आहे. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार आणि कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश करून आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे उदयनराजे भोसले यांच्यासह बहुंताशी बलाढ्य नेत्यांना मतदारांनी घरी बसविले आहे. 

बार्शीचे दिलीप सोपल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फर्डे वक्ते म्हणून ओळखले जात त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम करून थेट शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर साताऱ्याचे खासदार उदयनराजे, अकोल्याचे वैभव पिचड, करमाळ्याच्या रश्‍मी बागल, बीड जयदत्त क्षिरसागार, शहापूरचे पांडुरंग बरोरा तसेच कॉंग्रेसचे इंदापूरचे (जि.पुणे) नेते हर्षवर्धन पाटील यांनीही पक्ष बदलला त्यांना मतदारांनी पराभवाची धूळ चारताना चांगलाच धडा शिकविला आहे. 

ज्या पक्षाने मोठे केले त्या पक्षाच्या ऋणात न राहता स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्या मंडळींवर जनता नाराज होती. पक्ष सोडणारे काही नेते मात्र निवडून आले आहेत. पक्षांतर करताना भविष्यात कोणत्याही नेत्याच्या उरात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात पक्ष सोडणताना कोणालाही विचार करावा लागणार आहे. या निवडणुकीने राजकीय नेत्यांना वेगळा संदेश दिला आहे. 

यापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोरांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवसेना सोडल्यानंतर खुद्द ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह गणेश नाईक यांनाही पराभूत व्हावे लागले होते. मात्र बंडखोरांना घरी बसविण्याची ताकद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज पक्ष सोडून जात असतानाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार डगमगले नाहीत. 

उलट पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना पर्याय उभा नवीन रक्ताला संधी देऊन मैदानात उतरविले. याबाबत उदाहरण द्यायचे असेल तर बीडचे देता येईल. राष्ट्रवादी नेते जयदत्त क्षिरसागर हे मंत्री होते. पक्षाचे अतिशय विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र त्यांची पक्ष सोडून शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. या मतदारसंघात राष्ट्रवादीने संदीप क्षिरसागर यांच्यासाख्या तरूण नेत्याला मैदानात उतरविले. शरद पवार यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. याचा सर्व परिणाम जयदत्त क्षिरसागर यांच्या पराभवात झाले असे म्हणावे लागेल. 


 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com