हे वागंण बर नव्हं..!  शरद पवारांचा मोदींना टोला 

..
Sharad_Pawar_Modi
Sharad_Pawar_Modi

औरंगाबादः राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे वागंण बर नव्हं.. असा टोला लगावला आहे . औरंगाबाद येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवारांनी  पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान संदर्भात केलेल्या  विधानाला देखील प्रत्युत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत माझ्यावर टिका करतांना मी पाकिस्तानची स्तुती केल्याचे विधान केले. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने चुकीच्या माहितीवर अशा प्रकारचा आरोप जाहीर सभेतून करावा हे योग्य नाही. त्यांनी आधी मी काय बोललो याची माहिती मिळवायला हवी होती . 


पाकिस्तानातील सत्ताधारी आणि सैन्यातील अधिकारी सत्ता कायम राहावी म्हणून सतत भारताविरोधात बोलतात असे मी म्हणालो होतो, ही काय पाकिस्तानची स्तुती झाली का? मी देशाचा संरक्षणमंत्री राहिलो आहे, त्यामुळे पाकिस्तान काय चीज आहे, हे मला चांगल ठाऊक आहे. पण केवळ चुकीच्या माहितीवर पंतप्रधानांनी माझ्यावर टिका करावी हे न शोभणारे आहे. मी पण त्यांच्याबद्दल खूप काही बोलू शकतो, पण पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मला कायम राखायची आहे, त्यामुळे मी बोलणार नाही. मोदींचे हे वागंण बर नव्हं असा टोलायावेळी  पवारांनी मोदींना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com