मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरातील 'कर्तृत्ववान' सहकाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच ... 

.
Sharad_Pawar_chandrakant_dada
Sharad_Pawar_chandrakant_dada

कोल्हापूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे . मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश  यात्रा पुन्हा  सुरू केली आहे . यावर भाष्य करताना  शरद पवार म्हणाले,  मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरातील 'कर्तृत्ववान' सहकाऱ्यावर विश्वास असेल की ते  पूर परिस्थितीचा सामना करतील म्हणूनच त्यांनी पुन्हा यात्रा सुरु केली असावी !

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याती पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी श्री. पवार आज कोल्हापुर दौऱ्यावर होते. सायंकाळी त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. हॉटेल व्हीक्‍टर पॅलेस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी श्री. पाटील यांचे नांव घेता चांगलीच टिका केली. 

पाच-सहा दिवसांत पूरस्थिती निवळेल या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश  यात्रा सुरू केल्याकडे श्री. पवार यांचे लक्ष वेधले असता "त्यांचा या जिल्ह्यात कर्तृत्ववान  सहकारी आहे, ते या पूरस्थितीचा सामना करतील असा त्यांचा विश्‍वास असेल म्हणूच महाजनादेश यात्रा मुख्यमंत्र्यांनी  सुरू केली असावी'', असा टोला श्री. पवार यांनी लगावला. 

पूरग्रस्त भागातील कामासाठी आठ-दहा महिने लागतील, त्यासाठी कर्ज घेऊ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता श्री. पवार म्हणाले ,"  पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 6813 कोटी रूपयांची मागणी केली आहे.  केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे .  त्यामुळे ज्या मंत्र्यांनी हे सांगितले त्यांचे वजन नक्कीच दिल्लीत तितके असेल की 6800 कोटी रुपये  सहज मिळतील. ते जर नाही मिळाले तर मग कर्जाचा विचार करता येईल,  पण वेळ आली तर कर्ज काढावे, असा आणखी एक टोला श्री. पवार यांनी श्री. पाटील यांना लगावला.
 
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रूपाली चाकणकर, आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदि उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com