Sharad Pawar targets BJP leaders | Sarkarnama

मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवले, तर तुमचं 'हे' काय करतील? : शरद पवार

सरकारनामा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

ज्येष्ठ नेते  चिदंबरम यांना तुरुंगात टाकले, पण त्यासाठी कुठलेही कारण सांगितले नाही. मला 'ईडी'त गोवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यावरच उलटला.

-शरद पवार

नागपूर : " मुख्यमंत्र्यानी नागपूरला क्राईम सिटी ही नवी ओळख दिली, छत्रपतींचे स्मारक, इंदू मिलवरचे बाबासाहेबांचे स्मारकाचे काम शून्यच. मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवले, तर हे सरकार तुमचे काय हाल करेल, याचा विचार करा आणि आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा," असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज बुटीबोरी येथील जाहीर सभेत केले. 

हिंगणा विधानसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. सीमेवर शौर्य भारतीय सैन्याने दाखवले, अन मोदी सरकारने त्याचा राजकिय फायदा घेतल्याची टीका त्यांनी केली. या निवडणुकीत काश्मीर च्या 370 कलमाचा वापर या मंडळींकडून केला जात आहे, पण ते यशस्वी होणार नाहीत.

 यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या झाली असताना आम्ही त्यावेळी एका आठवड्यात 71 हजार कोटीचे कर्ज माफ केले होते. तेही शेतकऱ्यांना एकही फॉर्म भरायला न लावता, याशिवाय व्याजदर कमी केले होते.

ज्येष्ठ नेते  चिदंबरम यांना तुरुंगात टाकले, पण त्यासाठी कुठलेही कारण सांगितले नाही. मला 'ईडी'त गोवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यावरच उलटला. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असतानाही त्यांच्याच शहराला आज क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्यात धमक नाही, असेही श्री पवार म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख