किल्ल्यांवर छमछम, हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का? : शरद पवार

..
Sharad-Pawar@-Ghansawangi
Sharad-Pawar@-Ghansawangi

घनसावंगीः मोदी, शहा, नड्डा, मुख्यमंत्र्यांना इथे येऊन ठिकठिकाणी सभा घ्याव्या लागतायेत, त्यांच्या सभेला पन्नाल लोकही जमत नाही, कारण महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला सत्तेवरून खाली खेचायचं ठरवलंय, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी लगावला.

घनसावंगी येथील प्रचार सभेत बोलतांना त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टिका केली, मुख्यमंत्र्यांच्या आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत, पण समोर विरोधकच नाही या विधानाचा देखील पवारांनी पुन्हा एकदा समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस सांगतात की आखड्यात आमचा पैलवान कुस्तीसाठी तयार आहे. विरोधकांचे पैलवान तयार नाहीत, हे खर आहे, कारण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याने आम्ही खऱ्या पैलवानांशी लढतो. पाच वर्षापूर्वी अमित शहा हे नाव ऐकलं होत का? आम्ही 52 वर्षात 14 निवडणूका लढवल्या एकही निवडणूक हरलो नाही. हे केवळ जनतेच्या आशिर्वादामुळे. आणि आताचे सत्ताधारी आम्हाला विचारतात की तुम्ही काय केलं?

शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी अरबी समुद्रात भव्य स्वागत करू असे सांगितले. पंतप्रधान मोदींनी समुद्रात जाऊन पूजन केले, पण पाच वर्ष झाले हे स्मारक रेगांळले आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले पर्यटनासाठी खुले करू असे सांगितले  जाते. मात्र ज्या किल्यांनी इतिहास निर्माण केला त्याठिकाणी आता हे सरकार नाचगाणे, आणि छमछम सुरू करणार आहे. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का? असा संतप्त सवाल देखील पवारांनी यावेळी केला.

शरद राव तुम्ही काय केलं, असे विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही असले धंदे केले नाही. राज्य सहकारी बँकेचे सर्व संचालक मला  ओळखतात म्हणून मला ईडीची नोटीस पाठविली. पण जेव्हा मी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे ठरविले, तेव्हा मात्र दिल्ली व राज्यातून जावू नका असे फोन आले. पोलीस आयुक्तांनी राज्यातील वातावरण बिघडेल अशी भिती व्यक्त केली आणि आपल्या जाऊ दिले नाही,  असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com