शरद पवारांनी जागवल्या गीत रामायणाच्या आठवणी

अजरामर झालेल्या गीत रामायणाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रामनवमीच्या मुहुर्तावर गदिमांनी रचलेल्या गीत रामायणाच्या आठवणी जागवल्या
Sharad Pawar Talks About Geet Ramayan
Sharad Pawar Talks About Geet Ramayan

सातारा : अजरामर झालेल्या गीत रामायणाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रामनवमीच्या मुहुर्तावर गदिमांनी रचलेल्या गीत रामायणाच्या आठवणी जागवल्या. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतानाच प्रशासन व नागरीकांनी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात श्री. पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, ''कोरोनाच्या संकटामुळे रामनवमी सोहळ्याचे स्वरूप बदलणार आहे. आजची रामनवमीचा दिवस वेगळ्या कारणांची महत्वाचा आहे. यादिवशी 1955 मध्ये गीत रामायण पुण्याच्या आकाशवाणीवर प्रसारण सुरू झाले. एक एप्रिल 1955 मध्ये गीत रामायणाचे पहिले गीत आकाशवाणी पुणे यांनी प्रसिध्द केले. यामध्ये एकुण 56 गीते होती. ही गीत अजरामर झाली. त्याचे श्रेय ग. दि. माडगुळकर यांना द्यावे लागेल,''

ते पुढे म्हणाले, "या सगळ्या लोकांची मला गंमत वाटते. त्यांचे लिखाण, काव्य आणि काव्य रचनेत अचुक निवडलेले शब्द हे अलौकिक आहे. अशा व्यक्तींची पार्श्‍वभूमी ही तशीच आहे. पंढरपूरला जात असताना सांगोल्याच्या अलिकडे एक टेकडी लागते. त्या टेकडीवर एक पत्र्याचे घर आहे. त्या भागातील लोक या घराला बामणाचा पत्रा म्हणून ओळखतात. हा बामणाचा पत्रा म्हणजे गदिमा यांचे निवासस्थान. त्यांचे गाव माडगूळ असले तरी ते औंधाला आले व तेथे शिक्षण घेऊन ते पुण्यात आले. ते उच्च विद्याविभुषित नव्हते. पण अतिशय उत्तम साहित्यिक म्हणून त्यांचे नाव देशात झाले. गदिमांकडून गीत रामायण लिहिले गेले ते अजरामर झाले. गदिमांची शब्द रचना महत्वाची आहे. प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने त्यांना साथ दिली. गीत रामायणाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे, याचे मला समाधान वाटत आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com