sharad pawar supports subhash patil | Sarkarnama

कॅन्सरग्रस्त सुभाष पाटलांना दिला शरद पवारांनी भावनिक आधार

संपत मोरे
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : "माझ्या दोनच इच्छा होत्या. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि शरद पवार यांना भेटायचं. आज त्या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या,``अशी भावना नेरी (जि. जळगाव) येथील सुभाष पाटील यांनी व्यक्त केल्या.

मुंढवा येथे `सृजन`च्या वतीने आयोजित  क्रिकेट करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पाटील बोलत होते. पाटील हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. ते कर्करोगाने आजारी आहेत. शरद पवार यांचे `लोक माझे सांगाती` हे पुस्तक वाचून त्यांना आजारांवर मात करण्याची प्रेरणा मिळाली.

पाटील यांचा दिवसेंदिवस आजार बळावत चालला आहे. डॉक्टरांनी त्याना विश्रांती घ्यायला सांगितले आहे. पण त्यांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांना सांगितले," आता माझ्या दोनच इच्छा आहेत. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं आणि शरद पवार याना भेटायचं आहे. आज त्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आता माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत.माझं जीवन सार्थकी लागलं."असे भावनिक उद्गार त्यानी काढले.

जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी पाटील यांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली. यावेळी सुभाष पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर भाषण केले. त्यांच्या भावनिक भाषणाने उपस्थितही गहिवरले.यावेळी शरद पवार यांनी त्यांनी त्याना `तब्बेतीची काळजी घ्या`असं सांगून धीर दिला. तसेच नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख