शरद पवारांचे  निष्ठावंत कार्यकर्ते सुधीर धुमाळ यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जिल्हा सरचिटणीस सुधीर माधवराव धुमाळ (वय ६९) यांचे आज सोमवारी सकाळी अल्प आजाराने पुणे येथे निधन झाले.
Sharad Pawar Supporter Sudhir Dhumal Dies at Pune
Sharad Pawar Supporter Sudhir Dhumal Dies at Pune

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जिल्हा सरचिटणीस सुधीर माधवराव धुमाळ (वय ६९) यांचे आज सोमवारी सकाळी अल्प आजाराने पुणे येथे निधन झाले.

काँग्रेस (एस) पासून शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती. पक्षीय पातळीवर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यांचे मुळगाव सोनके (ता.कोरेगाव) असून धुमाळ हे विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. सातारा क्रांती प्रतिष्ठानचे माध्यमातून समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. 

सातारा ज्येष्ठ नागरिक संघाचे ते विद्यमानअध्यक्ष होते. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचेसंबंध होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com