शरद पवारांच्या पाठिंब्याची सोशल मिडियावर मोहिम

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगाने गळती लागली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच होतो आणि राहणार अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू केली आहे.... 'होय मी शरद पवार साहेब यांच्या सोबत आहे...' अशा 'टॅगलाईन'ने ही मोहीम सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
शरद पवारांच्या पाठिंब्याची सोशल मिडियावर मोहिम

बारामती शहर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगाने गळती लागली असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच होतो आणि राहणार अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू केली आहे.... 'होय मी शरद पवार साहेब यांच्या सोबत आहे...' अशा 'टॅगलाईन'ने ही मोहीम सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी आतापर्यंत स्वतःची छायाचित्रे टाकून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सोशल मीडिया वरून नमूद केले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते भाजप शिवसेनेत प्रवेश करत असताना दुसरीकडे अनेक सामान्य कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या सोबत आहेत असे चित्र या मोहिमेतून दिसत आहे . दुसरीकडे स्वतः शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी खंबीर राहावे मी एका कार्यकर्त्याचे शंभर कार्यकर्ते घडवू शकतो असा संदेश दिलेला असल्याने कार्यकर्ते आता उत्साहात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षांतर केलेल्यांना कावळ्याची उपमा देत गेले ते कावळे राहिले ते मावळे.... अशा 'टॅगलाईन' 'ने देखील अनेक पोस्ट कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून व्हायरल करत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याचे दिसत आहे.कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत आहेत हे चित्र सोशल मीडियातून दिसू लागले आहे .पडत्या काळात शरद पवार यांच्या सोबत कायम राहण्याची शपथ अनेक कार्यकर्त्यांनी घेतल्याचे या मोहिमेतून समोर येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com