एल्गार प्रकरणी साक्षीसाठी  शरद पवार यांना पाचारण

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा तपासाबाबत नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी ४ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे
Sharad Pawar Summoned to Depose before Bhima Koregaon Commission
Sharad Pawar Summoned to Depose before Bhima Koregaon Commission

पुणे :   कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा तपासाबाबत नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी  ४ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.  तसेच या तारखेत बदल होणार नाही अथवा पुढची तारीख मिळणार नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यातील ९ जण सध्या अटकेत आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा गुन्हा एनआयएकडे सोपवला होता.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवार यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने पवार यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com