कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शरद पवारांची सूचना - विजय वडेट्टीवार

एल्गारवरुन सध्या विविध चर्चा होत आहेत. एल्गारचे प्रकरण न्यायालयात आहे. यासंबंधी आमच्यात चर्चा होतात, मतभेद नाहीत. एवढेच काय पण कुठल्याही मुद्यांवरुन राज्यातील मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. कधी-कधी समन्वय राखण्यात मागेपुढे होते. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, अशी सुचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असल्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
sharad pawar suggested us to discuss with cm before any decision informs vijay wadettiwar
sharad pawar suggested us to discuss with cm before any decision informs vijay wadettiwar

नागपूर : एल्गारवरुन सध्या विविध चर्चा होत आहेत. एल्गारचे प्रकरण न्यायालयात आहे. यासंबंधी आमच्यात चर्चा होतात, मतभेद नाहीत. एवढेच काय पण कुठल्याही मुद्यांवरुन राज्यातील मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. कधी-कधी समन्वय राखण्यात मागेपुढे होते. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, अशी सुचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असल्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

यापूर्वीच्या युती सरकारमध्ये पूर्ण पाच वर्ष कमालिची भांडणे होती. एक म्हणायचा, मी वाघाची औलाद आहे. तुझ्या जबड्यात हात घालून दात पाडीन. तर दुसरा म्हणायचा की मी सिंह आहे. तुझा हातच तोडून टाकीन. पण अशा लोकांचे सरकारही पाच वर्ष चाललेच ना, असा प्रश्‍न करुन महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्ष चालेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे सरकार ठरेल, असा विश्‍वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला. 

एल्गार परीषदेच्या माध्यमातून एनआयएकडे चौकशी सोपवण्याची गरज ह्यांना आताच का वाटली. पूर्वीच्या महाराष्ट्राच्या पोलीसांवर विश्‍वास होता. अन त्याच पोलीसांवर आता विश्‍वास नाही का किंवा पोलीसांच्या तपासाची दिशा चुकली होती की आता चुकत आहे? एनआयएकडे तपास द्यायचाच होता तर तेव्हाच द्यायला पाहीजे होता. आता ही लोक कुणाला वाचवताय, असा प्रश्‍न वडेट्टीवारांनी उपस्थित केला.

याविषयी राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांच्यात चर्चा झाली. हा कामकाजाचा भाग आहे. यावर मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यानंतर त्यावर चर्चा करता येईल. साहित्यिक, लेखक अशा लोकांवर चुकीच्या पद्धतीने अन्याय होऊ नये. ते विनाकारण भरडले जाऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मी पुस्तक वाचले नाही
डॉ. विनोद अनाव्रत या लेखकाचे `शिवाजीचे उदात्तीकरण - पडत्यामागचे वास्तव' हे पुस्तक मी अद्याप वाचलेले नाही. पण महाराजांची बदनामी करणारे लेखन केले गेले असेल, तर महाराष्ट्र सरकार त्यावर बंदी घालेल. महाराजांबद्दल गैरसमज करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, खपवून घेतला जाणार नाही. या राज्यातच नाही, तर देशात व जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात महाराजांबद्दल वाईट लिहील्या जात असेल, तर त्यावर बंदी घातली जाईल. भाजपच्या मंडळींनी कधी महाराजांचा फोटो आपल्या कार्यालयात लावला नाही. तरीही मोदी आणि महाराजांची तुलना त्यांनी केली. या विषयात भाजपच्या नेत्यांना मात्र चांगल शहाणपण सुचलं. याबाबत त्यांच कौतुकच केल पाहीजे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com