... आणि शरद पवार यांनी  विदर्भ साहित्य संघाची ती अडचण सोडवली 

शासकीय भूखंडावर असलेल्या इमारतीचा उपयोग व्यवसायिक तत्वावर करता येत नाही. म्हणूनतत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वि. सा. संघाला विशेष अधिकार दिले. त्यानंतरच सात मजली इमारतीतील खालचे तीन मजले व्यावसायिकदृष्ट्या वापरले जातील व वरचे चारही मजले वि. सा. संघाच्या अखत्यारित राहतील, असा निर्णय घेण्यात आला.
Pawar-&-Sahitya-sangh
Pawar-&-Sahitya-sangh

नागपूर : उपराजधानीतील साहित्य विश्वातील धगधगते अग्निकुंड अशी विदर्भ साहित्य संघाची ओखळ आहे. कविवर्य सुरेश भट, ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर, कवी ग्रेस येथेच रमले, घडले, नावारूपाला आले.

सांस्कृतिक संकुलाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शिलान्यास 29 डिसेंबर 1993 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला होता. या घटनेचा गेल्याच वर्षी रोप्यमहोत्सव झाला आहे. या आठवणी आजही अनेकांच्या स्मरणात ताज्या आहेत. 

१९५२ साली तयार झालेली वि. सा. संघाची वास्तू जुनी झाली म्हणून इमारतीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र एक अडचण होती. पण ती तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दूर केली अन् भले मोठे संकुल सांस्कृतिक सेवेत रुजू झाले.

ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांचे चिरंजीव आजचे प्रसिद्ध वास्तूतज्ञ आशुतोष शेवाळकर यांना सांस्कृतिक संकुलाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. संकुलाची संकल्पना व रचनेचा आराखडा त्यांनीच तयार केला.

विशेष म्हणजे शासकीय भूखंडावर असलेल्या इमारतीचा उपयोग व्यवसायिक तत्वावर करता येत नाही. म्हणून  तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वि. सा. संघाला विशेष अधिकार दिले. त्यानंतरच सात मजली इमारतीतील खालचे तीन मजले व्यावसायिकदृष्ट्या वापरले जातील व वरचे चारही मजले वि. सा. संघाच्या अखत्यारित राहतील, असा निर्णय घेण्यात आला. 

या जागेत मिनी थिएटर, कलादालन, ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ, अभ्यागत दालने, कार्यालय, सभागृह, पार्किंग, ऍम्पी थिएटर, टेरेस गार्डन, सुशोभित दीर्घा आदींचा समावेश आहे. त्यानुसार कलादालन, ध्वुनिमुद्रणाचा स्टुडिओ, कार्यालय आदींचे काम पूर्ण झाले आहे. तर सातव्या मजल्यावरील 1250 खुर्च्यांचे मुख्य रंगमंदिराची नुकतिच यशस्वी चाचणी झालेली आहे. संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. लवकरच उद्‌घाटन होईल अशी अपेक्षा आहे. 

वैदर्भीय साहित्यिकांसाठी धनवटे रंग मंदिर नेहमीच आधारकेंद्र राहीले आहे. अनेकदा या संस्थेचे सक्रीय योगदान मिळाले नाही म्हणून थेट साहित्य चळवळ थंडावल्याचे देखील संस्थेवर आरोप झाले. मात्र प्रत्येक प्रसंगात संस्थेने स्वत:चे वर्चस्व बेधकडपणे सिद्ध केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com