शरद पवार सोलापूर दौरा : बबनदादा, संजयमामा आणि दीपकआबांची दांडी

सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीमधून माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेता रश्मी बागल यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज सोलापुरात मेळावा झाला.
शरद पवार सोलापूर दौरा : बबनदादा, संजयमामा आणि दीपकआबांची दांडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीमधून माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेता रश्मी बागल यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज सोलापुरात मेळावा झाला. 

या मेळाव्याला मोहोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने जिल्हा राष्ट्रवादीची एक प्रकारे प्रतिष्ठा या गर्दीने राखली. सोलापूर शहर राष्ट्रवादी, माळशिरस,  माढा, पंढरपूर, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या भागातील कार्यकर्त्यांनी आजच्या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याचे प्रकर्षाने जाणवले. 

या भागातील फक्त नेतेच मेळाव्याला उपस्थित राहिल्याचे दिसले. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ व उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसली. आजच्या या मेळाव्याला माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे, जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या मेळाव्याला दांडी मारली. त्यांच्या गैरहजेरीमुळे हेही नेते शिवसेना भाजपच्या संपर्कात असल्याचे आज स्पष्ट झाले. 

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांचाच प्रभाव आजच्या मेळाव्यात दिसला. आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ वगळता इतर मतदारसंघात राष्ट्रवादीचे काय हाल होणार आहेत याची झलकच आजच्या मेळाव्यातून स्पष्टपणे दिसली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com