कर्नाटकात मलाही पोलिसांनी मारले होते. पाठीवर व्रण उमटले होते...शरद पवार यांनी सांगितली आठवण

राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटकात मारहाण झाली त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली जुनी आठवण सांगितली. कर्नाटक पोलिसांचे हे कृत्य नवे नाही, असे पवार म्हणाले
Sharad Pawar Tells Experience about Karnataka Police
Sharad Pawar Tells Experience about Karnataka Police

नाशिक : राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटकात मारहाण झाली त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली जुनी आठवण सांगितली. कर्नाटक पोलिसांचे हे कृत्य नवे नाही. मी आणि एस. एम. जोशी बेळगाव येथे गेलो होतो. तेव्हा आम्हालाही पोलिसांनी मारहाण केली होती. अगदी पाठीवर व्रण उमटले होते, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

श्री पवार नाशिक दौ-यावर आले असता त्यांनी हाॅटेल एमराल्ड पार्क येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.  राज्यमंत्री पाटील यांना कर्नाटकात मारहाण झाली. पोलिसांनी दडपशाहीचा वापर केला. याविषयी ते म्हणाले, ''कर्नाटक पोलिसांचे हे कृत्य नवे नाही. मी आणि एस. एम. जोशी बेळगाव येथे गेलो होतो. तेव्हा आम्हालाही पोलिसांनी मारहाण केली होती. अगदी पाठीवर व्रण उमटले होते. छगन भुजबळांच्या वाट्यालाही हे आले आहे. आम्ही तर लवकर परतलो. मात्र भुजबळांवर कर्नाटक सरकारचे एव्हढे प्रेम की ते दोन महिने अडकून पडले होते.'' सीमा प्रश्नावर  काहीही झाले तरी आम्ही सीमा भागातील मराठी माणसांबरोबरच राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या इंदिरा गांधींविषयीच्या विधानावरून वाद सुरू आहे. याबाबत  आपल्याला काय वाटते? यावर ते म्हणाले, ''राऊत यांच्या त्या स्टेटमेंट पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. मात इंदिरा गांधी यांच्याबद्दल राऊत यांनी बोलायला नको होते, हे आमचे मत आहे. त्यांनी ते विधान आता मागे घेतले आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला पाहिजे, असे वाटते. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. यातील सगळेच काही त्यांना माहिती नसतात. महंमदअली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान उपस्थित होता, असंही वादळ एकदा उठलं होतं.  मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती."

राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत काय निर्णय झाला आहे? यावर याबाबत पक्षातील प्रमुख पदाधिकारी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्याबाबत अद्याप ठरले नाही, असे पवार म्हणाले. "राज्यात तीन पक्षांचं सरकार स्थापन  करताना आम्ही काही निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडी  सरकार पाच वर्ष चालवायचं आहे. त्यामुळे घटक पक्षांत अस्वस्थता निर्माण होईल अशी वक्तव्ये करू नयेत अशी सुचना केली आहे. सगळे शहाणे आहेत. काँग्रेस पक्ष व्यवहारी आहे. त्यामुळे त्यात काही अडचण येणार नाही. राज्य सरकार संबंधी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण, शेतीच्या पुनर्बांधणीचे धोरण ठरवलं आहे.  हे सरकार सर्व समाज घटकांच्या हितासाठी काम करील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीविषयी ते म्हणाले, की ८५ टक्के शेतकरी दोन लाखांच्या आत कर्ज असलेले आहेत. आता याच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  आगामी अंदाजपत्रकात उर्वरित १५ टक्के शेतकऱ्यांचा निश्वित विचार केला जाईल. विधानसभा निवडणुकीविषयी ते म्हणाले, विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात मी नाशकातून केली होती. महाराष्ट्रात बदल व्हावा ही या निवडणुकीत युवकांची भूमिका होती. त्याचा आम्हाला फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com