Sharad Pawar Says Some Compromises Done to Pull Down Shivsena BJP From Power | Sarkarnama

भाजप- शिवसेनेला सत्तेवरूनखाली खेचण्यासाठीच जाणीवपूर्वक तडजोडी : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप,शिवसेना सरकारला यावेळी काहीही झालं तरी आम्ही सत्तेवरून खाली खेचणार आहोत. त्यासाठी आम्ही काही ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले.

जळगाव : सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप,शिवसेना सरकारला यावेळी काहीही झालं तरी आम्ही सत्तेवरून खाली खेचणार आहोत. त्यासाठी आम्ही काही ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले.

जळगावातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, ''सत्ताधारी भाजपने सत्तेचा वापर करून सीबीआय, इडीचा वापर करून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही जणांना आपल्या पक्षात घेतले. गेल्या पाच वर्षात सरकारमध्ये असतांना जनतेची कोणतीच कामे न केल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखे काहीही नसल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातील लोकच आपल्याकडे घेतले आहेत. सत्ताधारी पैशाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहेत. ही अतीशय चिंताजनक बाब आहे.''

ते पुढे म्हणाले, ''त्यांनी शेतीचे प्रश्‍न सोडविलेले नाही, उद्योगाचे प्रश्‍न सोडविलेले नाहीत. आज राज्यभरात रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या राज्यातील या सरकाराला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून घालवलेच पाहिजे, त्यासाठी आम्ही निवडणूकीत काही जागावर आम्ही जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत.राज्यातील जनता यावेळी आम्हाला निश्‍चित साथ देईल, लोकसभेपेक्षा विधानसभेत निकालाचे चित्र निश्‍चितच वेगळे असेल.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख