एमजीएम गुणांचा डोंगर म्हणून मी याचा भाग : शरद पवार

अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखाली एमजीएम संस्थेची वाटचाल अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे, याचा अनुभव आम्हाला नेहमी येत असतो.
Sharad-Pawar-At-MGM
Sharad-Pawar-At-MGM

औरंगाबादः शैक्षणिक संस्थांकडे उत्पादनाचे साधन म्हणून पाहिले जाते, पण महात्मा गांधी मिशन ही संस्था त्याला अपवाद आहे. शिक्षण, सेवा आणि संशोधन याचे तंतोतंत पालन करणारी संस्था म्हणून एमजीएमकडे पाहिले जाते. मराठवाड्यातील शिक्षणाच्या प्रसारात एमजीएमचा मोठा हातभार असून ही संस्था म्हणजे गुणांचा डोंगर आहे आणि म्हणून मी याचा भाग असल्याचे गौरवोद्दगार राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी काढले.

महात्मा गांधी मिशनचे विश्‍वस्त अंकुशराव कदम यांचा 75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांच्या हस्ते अमृत महोत्सवी सोहळ्यात सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभेची माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, अनुराधा कदम, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, राजेश टोपे आदींची उपस्थिती होती.

अंकुशराव कदम यांच्या प्रवासाबद्दल बोलतांना शरद पवार म्हणाले, सामजिक जीवनात काम करणाऱ्या देशातील मोजक्‍या संस्थापैकी एमजीएम ही एक आहे. रयत संस्थेच्या माध्यमातून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दीडशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो, तसा एमजीएमकडून देखील केला जातो, पण त्याचा गवगवा कधी ते करत नाही. समाजकारण आणि राजकारणात सार्वजनिक आणि व्यक्तीगत जीवन स्वच्छ ठेवले पाहिजे. कुठलेही मोठे काम करायचे असेल तर घरातून पाठिंबा तर हवाच पण घरही व्यवस्थीत चालवता आले पाहिजे.

मराठवाड्याच्या बाबतीत नेहमीच हा भाग मागसलेला आहे असं म्हटल जात, पण मला हा शब्द आवडत नाही. या भागातही कतृत्ववान पिढी आहे. त्याची मक्तेदारी काही पुण्या-मुंबईकडे नाही, कदम कुटुंब हे त्याचे उदाहरण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. उस्मानाबादचे उध्दवराव पाटील हे मराठवाड्यातलेच, विधीमंडळात बजेटवर त्यांचे इतके अभ्यासपुर्ण आणि चांगले भाषण कुणी करत नव्हते, पण त्यांना न्याय मिळाला नाही असेही ते म्हणाले.

अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखाली एमजीएम संस्थेची वाटचाल अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे, याचा अनुभव आम्हाला नेहमी येत असतो. तुमच्या चांगल्या कामाचा आम्हाला त्रास देखील होतो.  लोक आम्हाला एमजीएममध्ये प्रवेश घ्यायचा आहे, पत्र द्या असे म्हणतात, अशी कौतुकाची थाप देखील पवारांनी कदम यांना दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com