उदयनराजेंविरोधात लढणार नाही: शरद पवार

उदयनराजे भोसले यांनी लागोपाठ तीन निवडणुका राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिंकल्या आहेत. त्यांनी काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्य़ा जागेची पोटनिवडणूक सद्या सुरू आहे.
उदयनराजेंविरोधात लढणार नाही: शरद पवार

पुणे: सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मी स्वत: उभे राहावे, असा सहकाऱ्यांचा आग्रह आहे, मात्र मी लढणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना सातारा पोटनिवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले,  मी स्वत: उभे राहावे, असा आग्रह आहे, पण पुर्वी जाहीर केल्याप्रमाणे मी निवडणूक लढणार नाही. आमच्यापुढे तीन चार पर्याय आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह श्रीनिवास पाटील, सुनील माने यांची नावे समोर आहेत. दोन तीन दिवसांत यासंबंधाने निर्णय करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com