शरद पवारांची साताऱ्यातील आमदारांशी तासभर कमराबंद चर्चा

चर्चा केल्यानंतर रात्री आठ वाजता रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी ते गेले.
शरद पवारांची साताऱ्यातील आमदारांशी तासभर कमराबंद चर्चा

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हॉटेल प्रितीमध्ये जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांशी सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. या चर्चेत लोकसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय काय परिस्थिती राहिली तसेच जिल्ह्यातील दुष्काळाची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले. 

उद्या (गुरूवारी) रयत शिक्षण संस्थेत होणाऱ्या कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार यांचे आज सायंकाळी सहा वाजता साताऱ्यात आगमन झाले. ते हॉटेल प्रिती येथे मुक्कामी आहेत. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, प्रभाकर घार्गे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, बाळासाहेब सोळसकर, सुधीर धुमाळ, राजकुमार पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हॉटेल प्रिती येथे आगमन झाले होते. 

श्री. पवार यांनी सुरवातीला सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर पक्षाच्या आमदारांशी कमराबंद चर्चा केली. यामध्ये प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघात लोकसभेला काय परिस्थिती राहिली. मताधिक्‍क्‍याचे काय, आदी प्रश्‍न विचारून माहिती घेतली. तसेच माढा मतदासंघात नेमके काय होईल, याची माहिती त्यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून जाणून घेतली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. प्रत्येक तालुक्‍यात सुरू असलेले टॅंकर, माण तालुक्‍यात सुरू असलेल्या छावण्या व तेथे शासकिय पातळीवर मदतीचा ही त्यांनी आढावा घेतला. तसेच राज्यात काय परिस्थिती राहिल आणि देशात काय होईल, याविषयीही आमदारांसोबत चर्चा केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com