sharad pawar recognizes my strength | Sarkarnama

घरच्यांनी खलनायक ठरविले; पण पवार साहेबांनी माझी कुवत ओळखली : मुंडे

तुळशीदास मुखेकर
रविवार, 16 डिसेंबर 2018

करंजी (नगर) : गोपीनाथ मुंडे साहेबांनी माझ्याशी रक्ताचे नाते तोडल्याचे भगवानगडावरून जाहीर केले. नंतर मला पुढे करत खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्यांनी नव्हे तर पवार साहेबांनी माझी कुवत ओळकून मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले, असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना दिले.

करंजी (नगर) : गोपीनाथ मुंडे साहेबांनी माझ्याशी रक्ताचे नाते तोडल्याचे भगवानगडावरून जाहीर केले. नंतर मला पुढे करत खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्यांनी नव्हे तर पवार साहेबांनी माझी कुवत ओळकून मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले, असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना दिले.

काही जण वारसा मुंडे साहेबांचा सांगतात आणि नाव मात्र दुसरऱ्यांच लावतात, अशी टीका पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती. त्यास धनंजय यांनी शेतकरी मेळाव्यात उत्तर दिले. मी बहिणीला विरोध करण्यासाठी नाही तर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोधी पक्षनेता झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

चिचोंडी (ता. पाथर्डी) येथे शेतकरी मेळावा व मंगल कार्यालयाचे उद्घाटन मुंढे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, दादासाहेब मुंढे, काशिनाथ लवांडे आदी प्रमुख उपस्थित होते.
   
दिवसा स्वप्न दाखवणाऱ्यांनी सर्वसामान्यांना भरदिवसा लुटले असून, या लुटणाऱ्या सरकारला आता जनताच उखडून टाकणार आहे. राज्यात व देशात परिवर्तन अटळ असल्याचे मुंडे यांनी या वेळी सांगितले.

`अच्छे दिन आने`वाले म्हणणारे कुठे गेले आहेत. साडेचार वर्षात फक्त महागाई वाढवली व सर्वसामान्य माणसाला जगणे मुष्कील केले. पेट्रोल,गॅस, दाळी सर्वच वस्तुचे भाव वाढवले, व सर्वसामान्य माणसाला लुटले. चार राज्याxत निवडणुका नसत्या तर पेट्रोलचे दर शंभरी पार करुन गेले असते. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही. मंत्रिमंडळात एकही शेतकरी किंवा शेतकऱ्याचा मुलगा नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना समजत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

मराठा आरक्षणाबाबत मुंढे म्हणाले पांडुरंगाची पूजा करण्यापासुन मुख्यमंत्र्यांना रोखले म्हणुन पांडुरंग पावला व मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे.

राम शिंदेंबाबत ते म्हणाले की सोयऱ्याकडे जनावरे ने म्हणायची हिम्मत कशी काय होते? अशी भाषा मंत्र्याच्या तोंडी शोभुन दिसत नाही. लाटेत आलेले आमदार ,खासदार जादा काळ टिकत नाहीत. त्यामुळे पुढील सरकार हे राष्ट्रवादीचे येणार असून वांबोरी चारी टप्पा दोन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवू,  असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख