Sharad Pawar is raising awareness through social media by posting unpaid daily! | Sarkarnama

न चुकता दररोज पोस्ट करून शरद पवार करताहेत सोशल मीडियातून जनजागृती ! 

संपत मोरे 
गुरुवार, 26 मार्च 2020

"सोशल डिस्टन्सिंग ही कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात वैश्विक समूहाची सामरिक नीती बनली पाहिजे."असे सांगून गर्दी करू नका आवाहन शरद पवार लोकांना करताना दिसत आहेत.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या फेसबुक पेजवरून दररोज कोरोनाच्या बाबतीत जनजागृती करणाऱ्या पोस्ट करून सतत जनतेच्या संपर्कात आहेत. अगदी साध्या साध्या गोष्टी ते लोकांना समजावून सांगत आहेत. काळजी घेण्याची आवाहन करत आहेत. 

'प्रशासनाला सहकार्य करा इथपासून ते अन्न व्यवस्थित शिजवून खा.'या गोष्टी ते कळकळीने सांगताना दिसत आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत पवार जनतेला आवाहन करत आहेत. कोरोना बाबतची माहिती देत आहेत. 

कोरोनाच्या बाबतीत काही अफवा आली. गैरसमज करणारे मेसेज आले तर शरद पवार लगेच त्याबाबतच्या सूचना करून लोकांना जागे करत आहेत. त्यांनी आज सकाळी "लसूण खाल्ल्याने कोरोनाच्या विषाणूला रोखता येऊ शकेल असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही."असे त्यांनी सांगितले आहे. 

 "कोरोना व्हायरस संबंधातली तथ्ये जाणून घेताना लक्षात येत आहे की हा व्हायरस उष्ण आणि दमट वातावरणात अधिक वेगान पसरतो. आपणच आपली योग्य काळजी घेऊन बचाव करू शकतो."असं पवार यांनी लोकांना सांगितले आहे. 

"जंतुनाशकाने सर्व पृष्ठभाग नियमित स्वच्छ करण्याची गरज आहे. कारण, कोरोना व्हायरस हवेत तासापर्यंत, तांब्याच्या पृष्ठभागावर तासापर्यंत, कार्डबोर्डवर तासांपर्यंत, प्लॅस्टिकवर दिवसांपर्यंत तर स्टेनलेस स्टीलवर ते दिवसांपर्यंत टिकतो."अशी माहिती पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये दिली आहे. 

"खाद्यपदार्थांच्या बाबतीत काळजी घ्या... 

वेगवेगळ्या सुर्या व चॉपिंग बोर्ड वापरा. शिजवलेलं अन्न हाताळण्याच्या दरम्यान स्वच्छ हात धुवा."असं पवार सांगत आहेत. शरद पवार फेसबुक पेजवरून रोज किमान दोन तीन पोस्ट करून लोकांना आवाहन करत आहेत. काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.राजकीय नेत्यांच्या,अधिकाऱ्यांच्या ते संपर्कात आहेतच पण सोशल मीडियावरून जनतेच्याही संपर्कात आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख