शरद पवारांच्या दौऱ्याने प्रशासन हलले; पंचनामे अंतिम टप्प्यात

राज्यात सत्ता स्थापनेचे नाट्य सुरु असतांनाच अतीवृष्टीने जिल्ह्यातील शेती, शेतकरी दोन्ही उध्वस्त झाले. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचुन त्यांना धीर दिला. या दौऱ्याने प्रशासन हलले. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश भागात पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळ सत्तेत नसुनही शरद पवार यांनी काढलेला दौरा शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरला आहे.
Sharad Pawar Flood Affected Area Tour Nashik District
Sharad Pawar Flood Affected Area Tour Nashik District

नाशिक : राज्यात सत्ता स्थापनेचे नाट्य सुरु असतांनाच अतीवृष्टीने जिल्ह्यातील शेती, शेतकरी दोन्ही उध्वस्त झाले. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचुन त्यांना धीर दिला. या दौऱ्याने प्रशासन हलले. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश भागात पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळ सत्तेत नसुनही शरद पवार यांनी काढलेला दौरा शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरला आहे.

अतीवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा सर्वप्रथम शरद पवार यांनी केला. या दौऱ्यात काही ठिकाणी तर पाऊस देखील सुरु होता. या पावसातही त्यांनी दौरा केला. यावेळी प्रशासनाला त्यांनी विविध सुचना केला. इगतपुरी, निफाड, दिंडोरी, सटाणा तालुक्‍यांतील पिरसरात त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. या दौऱ्याने प्रशासन हलले. त्याच दिवशी दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे हा दौरा फलद्रुप झाला. 

या दौऱ्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रीय समाज पक्षाचे, मंत्री महादेव जानकर यांनी दौरा केला. त्यानंतर सर्वच आमदार, खासदारांना या विषयाचे गांभिर्य कळले. ते देखील मतदारसंघात गावोगाव फिरु लागले. रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही दौरा झाला. महाजन यांनी प्रशासनाला विविध सुचना केल्या. मात्र, सर्वप्रथम झालेला शरद पवार यांचा दौराच फलद्रुप ठरला अशी शेतकरी व प्रशासनात चर्चा आहे.

पावसाचा, धरणाचा तालुका असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा सबंध जुन महिना कोरडा गेला. जुलै मध्ये पावसाला सुरवात झाली. मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत पाऊस सुरुच आहे. अगदी दुष्काळी तालुक्‍यांतील चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर यांसारख्या तालुक्‍यातील कधीही न वाहणाऱ्या नद्यांना पुर आले. विशेषतः खरीपाची पिके सोंगणीला आले असतांना परतीच्या पावसाने शेतीला चांगले झोडपले. यामध्ये मका, बाजरी, सोयाबीन, द्राक्षबागा, भाजीपाला या सगळ्यांचीच माती झाली. जिल्ह्यात 1253 गावांतील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचे सव्वीस हजार 847 हेक्‍टर क्षेत्रावरील पीके बाधीत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. 

यामध्ये सर्वाधीक 94 हजार शेतकऱ्यांची अठरा हजार 354 हेक्‍टर जिरायत पिके आहेत. आता पंचनामे सुरु असुन उद्या ते काम पुर्ण होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दहा हजार कोटींची मदत जाहिर केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते, याचीच सगळ्यांना प्रतिक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com