`ते' आमचे आमदार फोडणार असतील तर माहिती द्या - शरद पवार

`ते' आमचे आमदार फोडणार असतील तर आम्हाला माहिती द्या, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
`ते' आमचे आमदार फोडणार असतील तर माहिती द्या - शरद पवार

नागपूर - `ते' आमचे आमदार फोडणार असतील तर आम्हाला माहिती द्या, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

भाजपकडून आपले आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत का, या प्रश्‍नाच्या उत्तरात "मग तुम्हीच आम्हाला कळवा', असे पवार पत्रकारांना म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचे नाव घेण्याचे टाळले.

येणारे सरकार हे संपूर्ण पाच वर्षे चालावे, याकडे आमचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी कार्य 'फॉर्म्युला' असेल, त्यावर आमची चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर सरकार स्थापनेसाठी पावले उचलली जातील आणि एक दमदार, यशस्वी सरकार आम्ही महाराष्ट्राला देऊ. भविष्यात होणाऱ्या घडामोडींबद्दल आत्ताच निश्‍चीतपणे सांगता येणार नाही. पण कोणत्या वेळी कोणते कार्ड टाकायच, याचा निर्णय त्या-त्या वेळी घेऊ, असेही शरद पवार म्हणाले. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी आहे. त्यामुळे सरकार स्थापन होताच त्यादिशेने काम सुरु होईल. आम्ही सेक्‍युलर आहोत त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम ठरणे आवश्‍यक आहे आणि तेच काम सध्या यशस्वीपणे सुरु आहे. महाशिवआघाडीतील तिन्ही पक्ष उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com