आर.आर. पाटलांशी तुलना करून आमदार लंकेंचा केला पवारांनी गौरव

विजयानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. पवारांनी त्यांच्या कामगिरीवर खूष होत त्यांची तुलना स्व. आर. आर. पाटलांशी केली. आमदार लंकेंच्या रुपाने राष्ट्रवादीला आर. आर. पाटील यांच्यासारखा चेहरा मिळाल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.
MLA Nilesh Lanke With Sharad Pawar
MLA Nilesh Lanke With Sharad Pawar

नगर : विजयानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. पवारांनी त्यांच्या कामगिरीवर खूष होत त्यांची तुलना स्व. आर. आर. पाटलांशी केली. आमदार लंकेंच्या रुपाने राष्ट्रवादीला आर. आर. पाटील यांच्यासारखा चेहरा मिळाल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी भरघोष मतांनी विजयी होत शिवसेनेचे नेते विजय औटी यांचा पराभव केला. त्यांच्या कामगिरीवर राष्ट्रवादीचे नेते खूष झाले. आमदार लंके यांनी आपल्या समर्थकांसह काल बारामती गाठली. शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. 

पाणीप्रश्न सोडवू
पारनेर तालुक्यात किती पाऊस झाला, कुकडी कालव्याच्या आवर्तनाबाबत तक्रारींचे स्वरुप काय, पारनेर तालुक्याची दुष्काळी ही ओळख पुसण्यासाठी काय करता येईल, अशी विचारपूस पवार यांनी करून याप्रश्नी नियोजन करावे, असा सल्ला दिला. या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी तुमच्या पाठिशी आहे, असे आश्वासन दिले. औटी यांचा पराभव तब्बल साठ हजार मतांनी केला, त्याबद्दल पवार यांनी लंके यांचे कौतुक केले. इतके मताधिक्य मिळेल असे वाटले नव्हते, असे ते म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com