प्रवीण तू एक नंबर काम केले : शरद पवारांची शाब्बासकीची थाप!

प्रवीण तू एक नंबर काम केले : शरद पवारांची शाब्बासकीची थाप!

वालचंदनगर : `प्रवीण एक नंबर काम केले,` असा शब्दांत  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या कामाचे कौतुक केले.

शरद पवार यांनी रविवार(ता.२६) रोजी इंदापूर तालुक्यातील कौठळी व शेटफळगढे या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कौठळी मध्ये शरद पवार गाडीतुन उतरल्यानंतर सभापती प्रवीण माने यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारुन कौतुक केले.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातुन खासदार सुप्रिया सुळे यांना ७० हजार ९३८ विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये  इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी  कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कौतुकाबरोबरच प्रवीण माने यांचे कौतुक पवार साहेब यांनी केले.

यानंतर पवार यांनी बारामतीमधील कार्यक्रमामध्ये सोनाई उद्योग समुहाने इंदापूर तालुक्यामध्ये उभारलेल्या शेतीपूरक व्यवसायाबद्दल  उद्योजक दशरथ माने व सभापती प्रवीण माने यांचे कौतुक करुन  दररोज १८ लाख लिटर दुध संकलन करीत आहेत.  दुष्काळामुळे दूध उत्पादनावर काही प्रमाणात परीणाम झाला आहे. तसेच माने कुंटूब दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सोनाईच्या माध्यमातून चारा छावणी सुरु करणार असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com