sharad pawar is our leader but...? | Sarkarnama

शरद पवार हेच आपले नेते...पण....? : रामराजे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

फलटण : आमचा पक्ष हा रामराजे नाईक निंबाळकर असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असून त्याच विचाराने काम करण्याची ग्वाही आज फलटण मधील रामराजे समर्थक अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी दिली.

रामराजे यांच्या निवासस्थानी गुरुवारी (ता. १२) दुपारी तीन वाजता फलटण शहरासह तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती.

शरद पवार हेच आपले नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचा आजपर्यंत विकास झाला आहे. तथापि आजची राजकीय परिस्थिती पाहता पुढील काळात विकासाची गती कायम राहण्यासाठी कार्यकर्त्याचा विचार महत्वाचा आहे.  त्याचे म्हणणे उद्याच्या महामेळाव्यात ऐकून घेऊन त्यावर विचार होण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीच्या विचारातून पुढील राजकीय वाटचाल ठरविणार असल्याचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आजच्या बैठकीत अनेकांनी शिवसेना, भाजप व इतर कोणत्याही पक्षात जाण्याच्या तुमच्या निर्णयावर आम्ही ठाम असून आमचा पक्ष रामराजे असल्याने रामराजेसोबत आम्ही आहोत, असे सर्वांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ, नगराध्यक्षा नीता नेवसे, बंटीराजे खर्डेकर व गावोगावचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात त्यांनी भाजपत जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. दुसरे रामराजेही शरद पवारांना नेते मानत पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचे आणखी स्पष्ट झाले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख