शरद पवारांनी या वेळी मात्र नरेंद्र मोदींच ऐकण टाळलं... #9बजे9मिनट

रात्री नऊ वाजता मोदींच्या सांगण्यानुसार अऩेकांनी दिवे बंद करून पणत्या लावल्या...
sharad pawar- modi
sharad pawar- modi

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता देशातील जनतेला आपल्या घरातील दिवे बंद करून छोटी पणती, विजेरी लावण्याचे आवाहन केले होते.  या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

कोरोनाच्या विरोधात लढा देणारे आरोग्य सेवक, पोलिस यांच्या सन्मानासाठी पंधरा दिवसांपूर्वी टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. तेव्हा शरद पवार यांनी सहकुटुंब टाळ्या वाजवल्या होत्या. आज मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.

मोदींनी दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केल्यावर देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत होत्या पण पवार यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांनी आज मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही.

आज दिवे बंद करण्याची वेळ गेल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. त्यात आजच्या कार्यक्रमाची दखल न घेता उद्याच्या त्यांच्या फेसबुक लाईव्हची माहिती दिली आहे. पवार यांनी,"कोविड १९ विषाणू विरोधातल्या लढाईत विविध प्रशासकीय यंत्रणांना सहयोग देत आपण सामूहिक नीतीने आपली सिद्धता करत आहोत. आपल्या परिसरातील स्थानिक अडचणी व उपयुक्त सूचनांच्या अनुषंगाने सोमवार दि. ६ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता या पेजवर मी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद करत आहे. तुमचे प्रश्न पाठवताना तालुका व जिल्हा आवर्जून नमूद करावा."असे आवाहन करत नरेंद्र मोदी यांच्या आजच्या आवाहनाबाबत कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याप्रमाणे कृती केली. राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांनीही यापासून दूर राहणे पसंत केले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर दिवे बंद करायला मी मूर्ख नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com