सत्ताधारी रडीचा डाव खेळु शकतात :  शरद पवार

येत्या 7-8 मार्चला देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्‍यता आहे.
sharad-Pawar-
sharad-Pawar-

नाशिक :  "  राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदान यंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने, सत्ताधारी रडीचा डाव खेळु शकतात," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येथे बोलताना म्हणाले . 


चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. या वेळी श्री. पवार बोलत होते.

ते म्हणाले, "   ज्या राज्यांत भाजपाची सत्ता होती, ती राज्ये भाजपाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होणारच हे नक्की आहे .   पराभवाच्या शक्‍यतेने सत्ताधारी रडीचा डाव खेळु शकतात. सत्तेचा गैरवापर करु शकतात. लोकमत तुमच्या बाजुने असुनही काही वेगळे घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागरुक राहिले  पाहिजे . मला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 7-8 मार्चला देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्‍यता आहे. आपल्या भागात 3 किंवा 4 एप्रिलला मतदान प्रक्रीया पार पडेल. यावेळी कार्यकर्ते बुथ प्रमुखांनी सकाळी सहालाच मतदान केंद्रावर जाऊन तेथील मतदानयंत्रे तपासुन घ्यावीत. त्यात शंका वाटेल असे काहीही असल्यास लगेचच त्याबाबत उपाययोजना करावी. "

" छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडेच नाशिकची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या  पाठीशी ठामपणे उभे राहा. देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा खोटे आवतन देणाऱ्या या भाजपा सरकारला हद्दपार करा," असे आवाहनही श्री . पवार यांनी यावेळी  केले . 


माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले,'' देशात प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये  नाशिक सोळाव्या स्थानी  होते आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यावर नुकत्याच आलेल्या अहवालातून नाशिक गायबच झाले आणि त्याची जागा नागपूरने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक गायब झाले कुठे ? " 

" माझ्यावर कुठलेही आरोप होतात, तेव्हा आधी आरोप समीरवर करायचे असे षडयंत्र विरोधकांनी नेहमीच रचले आहे. माझ्यासोबत समीरलाही अटक करून मला संपवण्याचा कट रचण्यात आला. भुजबळांना कमजोर करायचं असेल तर समीरला कमजोर करा, हे षड्यंत्र आहे. पण मी किवा समीर असल्या कारस्थानांना पुरून उरू. जोपर्यंत कार्यकर्ते आणि नाशिकच्या जनतेचे प्रेम सोबत आहे, तोपर्यंत लढतच राहू", असा इशाराही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिला.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचीही या वेळी भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com