Sharad Pawar on Naryan Rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

 राणे नव्या पक्षात येण्यासाठी  स्वतःच्या मुलाचे मन वळवू  शकत नाहीत, शरद पवारांचा टोला 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

सोशल मिडीयावर दहशतीचा प्रयत्न
दरम्यान, सोशल मिडीयात सरकार विरोधी लिहणाऱ्या तरूणांना राज्य सरकार नोटीस पाठवत असल्याबाबत पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर हा हल्ला असून युवकांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पवार यांनी केला. यावेळी काही तरुणांना आलेल्या नोटीस देखील त्यांनी वाचून दाखवल्या. 

मुंबई : " नारायण राणे यांना शिवसेना व कॉंग्रेस मधे संधी मिळाली होती. मात्र, आता नवीन पक्ष स्थापन करताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील आमदार संपर्कात असल्याचा केलेला दावा हास्यास्पद आहे. पक्ष स्थापन करताना राणे स्वत:च्या आमदार पुत्राला देखील पक्षात येण्याबाबत मन वळवू शकले नाहीत . निकटवर्तीयच आले नाहीत तर पक्ष वाढणार कसा ? ," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला . 

नारायण राणे यांचा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय आणि विविध पक्षातून नेते त्यांच्याकडे येतील असा केलेला  दावा यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रांचे उत्तर देताना शरद पवार याने राणेंना शालजोडीतून लगावला . 

राष्ट्रवादी भवन मधे राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी व फडणवीस सरकारच्या धोरणांवर जोरदार नाराजी व्यक्‍त केली. जपान मधे आर्थिक मंदी असून त्यांची मंदी दूर करण्यासाठीच सरकारने बुलेट ट्रेनचा घाट घातल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

नोटबंदी व जीएसटी सारख्या लागोपाठच्या निर्णयाने देशात महागाई, मंदी व बेरोजगारी वाढत असून देशाच्या आर्थिक वृध्दीदरातली वाढती घट ही चिंताजनक आहे. त्यातच केंद्राची बुलेट ट्रेन व राज्य सरकारची कर्जमाफी निव्वळ फसवी असून लोकांना मोठी दिवास्वप्न दाखवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची  टीका  शरद पवार यांनी केली. 

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अमंबलजावणीच्या तारखा दोनदा पुढे ढकलण्यात आल्या. आता दिवाळीपुर्वी सरकार शेतकऱ्यांना कर्ज देणार असल्याचे सांगत आहे. दिवाळीपुर्वी ही कर्जमाफी मिळाली नाही तर 5 नोव्हेंबर नंतर राष्ट्रवादी राज्यव्यापी आंदोलन छेडेल ,असा इशारा पवार यांनी दिला. सरकार विरोधी या संघर्षात मी स्वत: सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. 

बुलेट ट्रेन बाबत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची केवळ तीन स्थानके राहणार आहेत. तर केवळ 35 मिनीटांचा प्रवास महाराष्ट्रातून असेल. तरीही राज्य सरकारने गुजरात प्रमाणे 30 हजार कोटी रूपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्राचा हा निधीतला अर्धा वाटा लाभदायक नाही. 

देशात नव्या उद्‌योगांना पोषक वातावरण नसल्याने नवी गुंतवणूक थांबली आहे. तर, जुने उद्‌योग मंदीच्या सावटात असल्याने उत्पादन व बेरोजगारी वाढत असल्याचे स्पष्ट करत पवार यांनी बेरोजगारीचे आकडे दिली. पुढील काही महिन्यात अनेक कंपन्यामधून युवकांना बेरोजगार होण्याचा धोका असल्याचेही ते म्हणाले. उद्‌योजकांमधे प्रचंड नाराजी व धास्तीचे  वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले . 

 
 

.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख