sharad pawar morning walk with old marathi songs 
sharad pawar morning walk with old marathi songs 

'सिल्वर ओक'वरील सकाळ आणि साहेबांच्या काळातील गाणी!

'सिल्वर ओक निवासस्थानी' लावण्यात आलेले गीत मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले असून त्याला यशवंत देव यांचे संगीत आहे.संपत मोरेपुणे: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकांना 'घराबाहेर पडू नका' असं अनेकदा सांगितलं आहे. त्यांनी लोकांना जे सांगितलं आहे, ते स्वतःही अंमलात आणले आहे. या काळात ते त्यांच्या मुंबईतील घराबाहेर पडलेले नाहीत. अगदी मॉर्निंग वॉकसुद्धा घरातच करत आहेत.

पुणे: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकांना 'घराबाहेर पडू नका' असं अनेकदा सांगितलं आहे. त्यांनी लोकांना जे सांगितलं आहे, ते स्वतःही अंमलात आणले आहे. या काळात ते त्यांच्या मुंबईतील घराबाहेर पडलेले नाहीत. अगदी मॉर्निंग वॉकसुद्धा घरातच करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात प्रशासन जे सांगत आहे ते ऐका, असे आवाहन राजकीय नेते करत आहेत. हे आवाहन करत असताना नेत्यांनीही आपण काय करतोय याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावे व ते घराच्या बाहेर पडू नये, असा त्यांचा हेतू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवरून सतत जनतेचे प्रबोधन करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी लोकांना सांगत आहेत. घराबाहेर पडू नका, असं आवाहन करत आहेत. स्वत: त्यांनीही घर सोडलेले नाही. घरातच बसून ते आढावा घेत आहेत. बुद्धिबळ खेळत आहेत. पुस्तक वाचत आहेत. त्यांचा रोजचा मॉर्निंग वॉकसुद्धा ते घरातच करत आहेत.

त्यांच्या मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ आज टिकटॉकवर एनसीपीच्या अकौंटवरून शेअर करण्यात आला आहे. घरात चालत असताना 'कारवाँ'वर त्यांनी 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी... ' हे गीत लावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे गाणे ऐकत पवारांचे चालणे सुरू आहे, दुसऱ्या बाजूला बाहेर पक्षांचा किलकिलाट सुरू आहे. महाराष्ट्रातील शेकडो तरुणांनी व्हाट्सएपवर हा व्हिडीओ स्टेटसला ठेवला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com