शरद पवार-रणजित देशमुख यांच्या भेटीत काय ठरलं?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची काल भेट घेतली. त्यांनी सुमारे पंधरा मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. दोन बड्या नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सध्या शहरात रंगली आहे. या भेटीत नेमके काय ठरले याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
शरद पवार-रणजित देशमुख यांच्या भेटीत काय ठरलं?

नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची काल भेट घेतली. त्यांनी सुमारे पंधरा मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. दोन बड्या नेत्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सध्या शहरात रंगली आहे. या भेटीत नेमके काय ठरले याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

शरद पवार दोन दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांचे सारथ्य अनिल देशमुख यांनीच केले. संपूर्ण दौऱ्यात अनिल देशमुख यांनीच गाडी चालविली. यावेळी गाडीत माजी आमदार तसेच रणजित देशमुख यांचे पुत्र आशीष देशमुख हेसुद्धा सोबत होते. त्यात पवार यांनी घरी जाऊन रणजित देशमुख यांची भेट घेतली. त्यामुळे भेटीची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

शरद पवार राज्यात सक्रिय असताना रणजित देशमुख यांचाही राजकारणात दबदबा होता. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जात होते. सोनिया गांधीनी त्यांना तसा शब्दही दिला होता. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. दुदैवाने निवडणुकीत देशमुख पराभूत झाले. रणजित देशमुख सध्या पार्किनसन आजाराने त्रस्त आहेत. आता आशीष देशमुख सक्रिय झाले आहेत. 

दरम्यान, पवार यांची ही सदिच्छा भेट होती. त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com