कोल्हापूरात लोकसभेला उमेदवार पडलाच कसा ? 

पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे या बैठकीला अनुपस्थित राहीले. श्री. मुश्रीफ यांनी आज कागल येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यामुळे ते या बैठकीला गेले नसल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूरात लोकसभेला उमेदवार पडलाच कसा ? 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पडलाच कसा ? असा थेट सवाल आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील पदाधिकऱ्यांना विचारला. उमेदवारांविषयी असलेली नाराजी, पक्षांपासून त्यांनी घेतलेली फारकत आदि कारणांमुळे हा पराभव झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोरच उत्तर दिल्याचे समजते. 

लोकसभा निकालाची कारणमीमांसा व विधानसभेची तयारीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आज श्री. पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. बैठकीला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक राजू लाटकर आदि प्रमुख नेते उपस्थित होते. सकाळी दहा वाजताच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून लोकसभेच्या पराभवाची कारणे श्री. पवार यांनी ऐकून घेतली. 

लोकसभेला उमेदवार पडला का? या श्री. पवार यांच्या प्रश्‍नावर काही काळ पदाधिकारी निरूत्तर झाले. पण नंतर उमेदवारांविषयी नाराजीबरोबरच कॉंग्रेसच्या एका गटाने मदतच केली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. या दोन कारणांबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचाही फटका दोन्हीही मतदार संघात बसल्याचे सांगण्यात आले."वंचित' मुळे कॉंग्रेसच्या पारंपारिक मतांत विभागणी झाली, त्यातून दोन्ही मतदार संघात 'वंचित' च्या उमेदवारांनी दोन लाख मते घेतल्याने राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागला, असेही काहींनी सांगितले.

कॉंग्रेसचा एक गट सोडून दोन्ही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी चांगले प्रयत्न केले, पण कार्यकर्त्यांनीच नेत्यांचे ऐकले नसल्याचे राधानगरीच्या एका पदाधिकाऱ्याने यावेळी सांगितले. हातकणंगले लोकसभा मतदार संघात माजी मंत्री विनय कोरे यांचीही आपल्याला मदत झाली नसल्याची तक्रार मानसिंगराव गायकवाड यांनी यावेळी केल्याचे समजते. पदाधिकाऱ्यांचे श्री. पवार यांनी फक्त ऐकून घेतले, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 

बैठकीला पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष, उद्योजक व्ही. बी. पाटील, शिरोळचे चंगेजखान पठाण, इचलकरंजी नगरपालिकेचे सभापती नितिन जांभळे, बी. एन. पाटील-मुगळीकर, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा जहीदा मुजावर, कार्याध्यक्ष अनिल साळोखे आदि उपस्थित होते. 
 
या बैठकीत इचलकरंजीचे नगरसेवक नितिन जांभळे बोलायला उठल्यानंतर श्री. पवार यांनी त्यांना इचलकरंजीत शिवसेनेला 75 हजाराचे मताधिक्‍य अशी विचारणा केली. त्यावर श्री. जांभळे यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्‍नाबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेली भुमिका त्यांना नडल्याचे सांगितले.  

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com