Sharad Pawar to Meet Sonia Gandhi soon over Maharashtra Row | Sarkarnama

सरकार स्थापनेचा पेच : शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

राज्यातील राज्यकीय घडामोडीबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद लवकरच नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. दरम्यान येत्या मंगळवारी ता. 12 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनिती ठरणार असल्याचे सांगितले जाते.

मुंबई : राज्यातील राज्यकीय घडामोडीबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद लवकरच नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. दरम्यान येत्या मंगळवारी ता. 12 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनिती ठरणार असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला असला तरीही नवीन स्थापन सरकार झालेले नाही. तेराव्या विधानसभेचा कालावधी शनिवारी साडेपाच वाजता संपला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहत आहेत. अशा राजकीय अस्थिरतेत राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. ते सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला निमंत्रण देणार आहेत का? याविषयी तर्कवितर्क लढवले जात असताना येत्या मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्या 54 आमदारांना मुंबईत बैठकीला बोलावले आहे.

राज्यातील घडामोडी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षाने आपल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे. सत्ता स्थापन होताना भाजप घोडेबाजार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही म्हणून ही खबरदारी घेतली आहे. कॉंग्रेस पक्षाने आपले आमदार जयपूर राजस्थान येते पाठवले आहेत तर शिवसेनेने मुंबईतच सुरक्षित ठिकाणी रवाना केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनिती ठरवली जाणार आहे. दरम्यान, शरद पवार हे पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीत राज्यातील घडामोडीबाबत चर्चा करणार असून संभाव्य सत्ता स्थापनेबाबत सोनिया यांच्याशी सल्लामसलत करतील असे सांगण्यात येते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख