पवारांनी प्रेम दिले पण स्वकियांनी घात केला : धनंजय महाडीक

.
dhananjay_mahadik
dhananjay_mahadik

सोलापूर  : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर प्रेम केले. माझा त्यांच्यासोबत कोणताही वाद नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वकियांनी आपला घात केल्याने आज भाजपत प्रवेश करत असल्याची माहिती कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिली. 

केंद्रीयगृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर माजी खासदार महाडीक त्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादीला साथ दिली. कार्यकर्त्यांची मागणी व परिसरातील प्रश्‍नांसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज सोलापुरात होत आहे. आज माजी आमदार राणा जगजितसिंग पाटील, माजी आमदार जयकुमार गोरे आणि माजी खासदार महाडीक यांचा भाजपत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com