नगरच्या एमआयडीसीबाबत शरद पवार लक्ष घालणार

नगरच्या औद्योगिक वसाहतीतील प्रश्नासाठी आता ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. तसे आश्वासन आज आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात औद्योगिक वसाहतीचे प्रश्न तातडीने सुटतील, अशी आशा नागरिकांना आहे
Sharad Pawar to look into Ahmednagar MIDC Issues
Sharad Pawar to look into Ahmednagar MIDC Issues

नगर : नगरच्या औद्योगिक वसाहतीतील प्रश्नासाठी आता ज्येष्ठ नेते शरद  पवार लक्ष घालणार आहेत. तसे आश्वासन आज आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात औद्योगिक वसाहतीचे प्रश्न तातडीने सुटतील, अशी आशा नागरिकांना आहे.

नगर औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी, तसेच विस्तारासाठी आमदार संग्राम जगताप यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. 'आमी' (उद्योजकांची संघटना) संघटनेतर्फे पुढाकार घेतला जात आहे. उद्योजकांनी मांडलेल्या प्रश्नांची यादी घेवून आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेवून त्यांना हे प्रश्न सांगितले. निवेदन देवून या प्रश्नांत लक्ष घालण्यासाठी साकडे घातले. त्यावर पवार यांनी औद्योगिक वसाहतीतील प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. 'आमी' संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे, सुनील कानवडे, सागर निंबाळकर, सचिन काकड, मिलिंद कुलकर्णी आदींनी पवार यांना या प्रश्नांचे गांभिर्य सांगितले.

नगरमध्ये मोठा उद्योग हवाच

नगरच्या औद्योगिक वसाहतीत मोठी कंपनी नसल्याने इतर लहान उद्योगांना चालना मिळत नाही. त्यामुळे मोठ्या कंपन्या येथे येण्यासाठी आमदार जगताप यांचे प्रय़त्न सुरूच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आयटी हब तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, काही आयटी कंपन्यांच्या शाखा नगरमध्ये सुरू होऊ शकल्या. मात्र मोठे उद्योग नगरला आल्यास रोजगार मोठ्या प्रमाणात तयार होईल, यासाठी शरद पवार यांनी विशेष प्रय़त्न करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी पवार यांच्याकडे केली आहे.

वचनपूर्तीच्या दिशेने

विधानसभा निवडणुकीपुर्वी शरद पवार नगरला आले होते, तेव्हा त्यांनी नगरला औद्योगिक वसाहतीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. आमदार संग्राम जगताप यांनी युवकांचे संघटन करून याच मुद्द्यावर विधानसभेसाठी युवकांना आपलेसे केले होते. युवकांसाठी रोजगार मेळावे भरवून अनेक कंपन्यांतर्फे मुलाखती आयोजित केल्या होत्या. जगताप यानी दिलेले आश्वासनपूर्ती करण्याची आता वेळ आली असून, जगताप यांनी औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडवून वचनपूर्ती करण्याची मागणी उद्योजकांमधून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार लक्ष घालणार असल्याने उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com