Sharad Pawar knows party workers for last 50 years : Ajit Pawar | Sarkarnama

गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांना ओळखतात  : अजित पवार 

युवराज पाटील
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर :  "कोल्हापूरसह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील.  त्यावर इथे पुन्हा चर्चेची गरज नाही ,"अशा शब्दात अजित पवार यांनी आज स्थानिक नेत्यांची कानउघडणी केली. त्यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार धनंजय महाडिक यांची पाठरखणच केली . 

कोल्हापूर :  "कोल्हापूरसह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील.  त्यावर इथे पुन्हा चर्चेची गरज नाही ,"अशा शब्दात अजित पवार यांनी आज स्थानिक नेत्यांची कानउघडणी केली. त्यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार धनंजय महाडिक यांची पाठरखणच केली . 

शरद पवार यांनी मुंबईत गेल्या पंधरवाड्यात  राज्यभरातील लोकसभा मतदार संघांचा आढाव घेतला होता . तेंव्हा कोल्हापूर मतदार संघातील धनंजय महाडिक यांनी पक्ष विरोधी काम केल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये असे मत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्यांनी मांडले होते.

आजही काही नेत्यांनी हा विषय खाजगीत काढण्याचा प्रयत्न केला होता .  त्याचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले , "  जी मते मांडायची आहेत ती शरद पवार यांच्या समोर मांडली आहेत . उमेदवारी कोणाला द्यायची व कोणाला नाही याचा निर्णय तेच घेतील त्यामुळे पुन्हा यावर जाहीर चर्चेची गरज नाही . 

गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार हे कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांना बारकाईने ओळखतात हे सांगायलाही अजित पवार  विसरले नाहीत . 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आयोजित युवकांच्या एल्गार परिषदेत ते बोलत होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे परिषद झाली. आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजंय महाडिक, आमदार शशिकांत शिंदे.आमदार संध्यादेवी कुपेकर, युवक प्रदेशाध्यक्ष संग्रासिंह कोते-पाटील,रक्षणा सलगर,जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, निवेदिता माने, शिरोळचे नूतन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आर. के. पोवार आदि उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख