यवतमाळ-वाशीम मतदारसंघाबाबत शरद पवारांची इंद्रनील नाईकांशी चर्चा 

यवतमाळ-वाशीम मतदारसंघाबाबत शरद पवारांची इंद्रनील नाईकांशी चर्चा 

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे घेण्याचे सूत्र जवळपास निश्‍चित झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संदर्भात यवतमाळ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेता इंद्रनील नाईक यांच्याशी चर्चा केली आहे. 

यवतमाळ-वाशिम मतदारसंघ जागा वाटपामध्ये कॉंग्रेसकडे आहे. गेल्या 20 वर्षांपासून या मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार मनोहर नाईक व माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. या मतदारसंघावर बंजारा व कुणबी मतदारांचा वरचष्मा राहिला आहे. नाईक घराण्याचा बंजारा समाजावर प्रभाव असल्याने या घराण्यातील व्यक्तींना उमेदवारी दिल्यास विजयश्री खेचून आणणे सोपे जाईल, असे बोलले जात आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईत या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मनोहर नाईक व सुभाष ठाकरे यांनी यवतमाळ मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे घेण्याचा युक्तीवाद केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी इंद्रनील नाईक यांचे नाव पुढे केले. इंद्रनील नाईक हे मनोहर नाईक यांचे सुपुत्र आहेत. या बैठकीनंतर शरद पवार यांनी इंद्रनील नाईक यांच्याशी व्यक्तीगत चर्चा केली. शरद पवार यांनी इंद्रनील नाईकांशी व्यक्तीगत चर्चा केल्याने इंद्रनीलच्या उमेदवारीला वजन आले आहे. 

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या बदल्यात कॉंग्रेसला अमरावती लोकसभा मतदारसंघ देण्याचा फॉर्म्युला निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे अमरावतीमध्ये प्रभावी उमेदवार नसल्याने हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला कोणतीही अडचण नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com