शरद पवारांनी आता अजितदादांवर दिली ही नवी जबाबदारी

...
sharad pawar-ajit pawar
sharad pawar-ajit pawar

आळंदी : ``इंद्रायणी शुद्धीकरण करणे ही वारकरी संप्रदायासह समाजाची मागणी असून ती मला भावली. समाजाच्या अपेक्षांची पू्र्तता करणे पवार घरण्यातील जन्मलेल्यांचीच राहिल. काळजी करू नका. माझे आश्वासन हे आश्वासन नाही तर ते माझे कर्तव्य आहे, अशी घोषणा माजी केंद्रिय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी आळंदीत केली.

पवार यांच्या वक्तव्यामुळए उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जबाबदारी आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि पवार घराण्यात जन्मले असल्याने अजित पवार यांची इंद्रायणी शुद्धीकरणाबाबत आता जबाबदारी अधिक वाढली आहे. यामुळे इंद्रायणीच्या आणि माउलींच्या संजीवन समाधीच्या साक्षिने वारक-यांना शब्द थोरल्या पवार साहेबांनी जरी दिला असला तरी तो पूर्ण करण्याची जबाबदारी धाकट्या पवारांवर आली आहे.

जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पवार बोलत होते.  राज्यभरातून हजारोंच्या संख्येने वारकरी या कार्यक्रमासाठी जमले होते. दरम्यान जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्यासह आळंदी नगरीच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले यांच्यासह शहरातील विविध संघटना आणि वारकरी यांनी श्री. पवार यांच्याकडे इंद्रायणी प्रदुषण थांबवून त्याचे शुद्धीकरण करण्याची मागणी केली.

यावेळी श्री. पवार म्हणाले, ``नदी पवित्र, सुंदर राहिली तर ती समाजाला उपयुक्त आहे. समासाजासाठीची मागणी असेल तर सरकार पाठीशी उभे राहिेल.  अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री,पालकमंत्री असण्यासोबत अर्थमंत्रीही आहेत. ते याची दखल नक्की घेतील. 

इंद्रायणीचे एक उगमस्थान पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळ आहे. तर दुसरे उगमस्थान वडिवळे धरणातून होत असून दोन्ही प्रवाह कामशेत येथे एकत्र मिळतात. त्यानंतर पुढे इंद्रायणी वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीजवळील आंबी औद्योगिक भागापासून ते इंदुरीतून येते. त्यानंतर देहू आणि पिंपरी महापालिका हद्दीतून आळंदीत येते. आळंदीपासून पुढे तुळापूरपर्यंत प्रदुषण झाले. मावळ आणि खेड तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर मावळ भागात लोणावळा येथे भाजपाची सत्ता, वडगाव मावळ कॉंग्रेस राष्ट्रवादीची,तर तळेगावात भाजपाचा नगराध्यक्ष असला तरी राष्ट्रवादीचे प्राबल्य अधिक आहे. पिंपरी महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तर आळंदीत भाजपाची सत्ता आहे.

तरिही पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि प्रशासनावर अजित पवार यांची मजबूत पकड आहे. त्यातच अर्थखातेही अजित पवार यांच्याकडे असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. थोरल्या पवार साहेबांनी माउलींच्या इंद्रायणीच्या साक्षिने हजारोंच्या संख्येने वारक-यांना इंद्रायणी शुद्धीकरणाचा शब्द दिल्याने तो अंमलात आणण्याची जबाबादारी आता पालकमंत्री आणि अर्थमंत्री असल्याबरोबर पवारांच्या घरात जन्म झाला म्हणून अजित पवारांची अधिक बनली आहे. आता वारक-यांना वेध लागले ते प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते त्याची.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com