शरद पवारांनी टोचले पोलिसांचे कान

लाॅक डाऊनच्या काळात पोलिसांनी काही ठिकाणी आक्रमक होत मारहाण केल्याने त्यावर राज्यात नाराजीची भावना आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली.
sharad pawar
sharad pawar

पुणे : राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.आरोग्य, महसूल आणि पोलिसांच्या यंत्रणेवर ताण आहे.मात्र, काम करताना पोलिसांनी सामंजस्याने घेण्याची गरज आहे, या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलिसांचे कान टाेचले.

पोलिसांच्या काठीला तेल लावल्याची भाषा खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच वापरल्याने राज्यात अत्यावश्‍यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानाही पोलिसांनी त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांचा आजचा सल्ला पोलीस खात्याला चिंतन करायला लावणारा आहे.

टवाळखोरांना आवरण्याच्या नादात पोलिसांनी अत्यावश्‍यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्याच्या तर काही ठिकाणी मारहाण केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात राज्यात घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे घराच्या आवारात बोलत उभ्या राहिलेल्या लष्कारातील जवानालादेखील बेदम मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. लॉकडॉऊन आणि जमावबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. मात्र, जे लोक अत्यावश्‍यक सेवा देत आहेत.त्यांना रस्त्यावर जाण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र, अशा लोकांची पूर्ण चौकशी न करता त्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाश्‍र्वभूमीवर पवार यांनी आज ‘फेसबुक लाइच्ह’ माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.

शेती, शेती उत्पादनांची वाहतूक, अवकाळी पाऊस यासारख्या विविध विषयावर त्यायना प्रश्‍न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिसांना सामंजस्याने वागण्याचा सल्ला दिला.शेतकरी, ग्रामीण भागात हातावर पोट असणारा शेतमजूर, छोटे व्यापारी यांच्यासह समाजातील सर्वच घटक सध्या अडचणीत आहेत. सर्वावरच संकटाची वेळ आली आहे. अशावेळी ज्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे, असे पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com